तुम्हीही बोटांनी लावता लिप बाम? तुमची हिच सवय ठरते धोकादायक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 04:24 PM2019-01-29T16:24:45+5:302019-01-29T16:25:34+5:30

तुम्हाला माहीत आहे का? हाताची बोटंही तुमच्या ओठांचं सौंदर्य कमी करण्यासाठी कारणीभूत ठरतात. खरं तर आपल्या चेहऱ्याचं सौंदर्य खुलवण्यासाठी ओठ महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. त्यामुळे ओठांची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं.

You also apply lip balm with finger on lips this habit can be dangerous | तुम्हीही बोटांनी लावता लिप बाम? तुमची हिच सवय ठरते धोकादायक

तुम्हीही बोटांनी लावता लिप बाम? तुमची हिच सवय ठरते धोकादायक

googlenewsNext

तुम्हाला माहीत आहे का? हाताची बोटंही तुमच्या ओठांचं सौंदर्य कमी करण्यासाठी कारणीभूत ठरतात. खरं तर आपल्या चेहऱ्याचं सौंदर्य खुलवण्यासाठी ओठ महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. त्यामुळे ओठांची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं. थंडीमध्ये तर ओठांची त्वचा कोरडी पडते, अशातच ओठांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी आपण त्यावर लिप बाम लावतो. पण आपल्यापैकी बरेचजण आपल्या हाताच्या बोटांनी लिप बाम ओठांवर लावतात. यामुळेच ओठांचं सौंदर्य वाढण्याऐवजी कमी होतं. त्याचबरोबर इन्फेक्शन होण्याचा धोकाही वाढतो. आपण आपल्या नकळत हात न धुता इकडे तिकडे वावरलेल्या हातांनी लिप बाम लावतो. जे आपल्या आरोग्यासोबतच सौंदर्यासाठीही हानिकारक ठरतं. अशातच सर्वात आधी आपले हात व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतरच ओठांवर लिप बाम लावा. 

हाताच्या बोटांनी लिप बाम लावल्याने काय होतं?

लिप बाम लावल्याने ओठांची कोरडी पडलेली त्वचा रिपेअर होण्यास मदत होते. तसेच ओठांच्या सौंदर्यातही भर पडते. अनेकदा आपण प्रवासात किंवा ऑफइसमध्ये पर्समधून लिप बामची डबी काढतो आणि हाताच्या बोटांनी तो ओठांवर लावतो. पण तुम्ही कधी एक गोष्ट लक्षात घेतली आहे का? यामुळे तुम्हाला किती प्रकारचं इन्फेक्शन होऊ शकतं? हाताच्या बोटांनी लिप बाम लावून तुम्ही स्वतःच अनेक आजारांना निमंत्रण देत असता. 

हाताच्या बोटांनी लिप बाम लावणं का ठरतं असुरक्षित?

आपण दिवसभरामध्ये अनेक कामं करत असतो. याचदरम्यान आपल्या हाताच्या बोटांवर अनेक प्रकारचे बॅक्टेरिया चिकटतात. हे बॅक्टेरिया इतके छोटे असतात की, आपल्या डोळ्यांना ते दिसत नाहीत. तुम्ही फक्त विचार करून पाहा, आपण दिवसभरात टॉयलेटच्या दरवाजाचा हॅन्डल किंवा फ्लशचा वापर करतो आणि त्यानंतर लगेच हाताच्या बोटांनी लिप बामचा वापर करता. त्यानंतर हेच बॅक्टेरिया तोंडातून शरीरामध्य प्रवेश करतात आणि तुम्हाला आजारी करतात. 

एवढचं नाही तर आपला मोबाइलही दिवसभर आपल्या हातातच असतो. तुम्हाला कदाचित हे माहीत नसेल की, आपल्या मोबाइल स्क्रिनवर टॉयलेट सीटएवढे बॅक्टेरिया चिकटलेले असतात. कधीकधी मोबाइल हातात असतानाच आपल्या लक्षात येतं की, आपले ओठ कोरडे पडले आहेत, आपण त्याच हातांनी लिप बाम ओठांवर लावतो. 

असा करा बचाव...

जर तुम्हीही हाताने लिप बाम लावत असाल तर, लगेचचं तुमची ही सवय बदलून टाका. त्याऐवजी तुम्ही स्टिक असलेला लिप बाम वापरू शकता. जर तुम्ही स्टिक असलेला लिप बाम लावण्यासाठी कंफर्टेबल नसाल तर लिप बाम लावण्यासाठी तुमचा हात स्वच्छ करा आणि त्यानंतरच लिप बाम ओठांवर लावा. 

Web Title: You also apply lip balm with finger on lips this habit can be dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.