मॉयश्चरायझरचा वापर करणं टाळताय?; मग कमी वयातच दिसाल म्हातारे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2019 11:36 AM2019-08-07T11:36:19+5:302019-08-07T11:37:11+5:30
आपण थंडीमध्ये त्वचा सॉफ्ट ठेवण्यासाठी मॉयश्चरायझरचा वापर करतो. त्यामुळे कोरड्या आणि शुष्क त्वचेची समस्या दूर होते. परंतु, मॉयश्चरायझर फक्त थंडीतच नाही तर दररोज, प्रत्येक सीझनमध्ये लावणं फायदेशीर ठरतं.
आपण थंडीमध्ये त्वचा सॉफ्ट ठेवण्यासाठी मॉयश्चरायझरचा वापर करतो. त्यामुळे कोरड्या आणि शुष्क त्वचेची समस्या दूर होते. परंतु, मॉयश्चरायझर फक्त थंडीतच नाही तर दररोज, प्रत्येक सीझनमध्ये लावणं फायदेशीर ठरतं. पण जर तुम्ही फक्त थंडीतच मॉयश्चरायझरचा वापर केला आणि इतर दिवशी मॉयश्चरायझर लावणं टाळलं तर मात्र तुम्ही वेळे आधीच म्हातारे दिसू शकता. फक्त एवढचं नाहीतर त्वचेशी निगडीत इतरही अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
सुरकुत्या
त्वचेमधील ओलावा कमी झाला की, चेहऱ्यावर आणि त्वचेवर सुरकुत्या दिसू लागतात. हायड्रेशन आणि मॉयश्चरायझरची कमतरता लो ग्रेड इन्फ्लेमेशन क्रिएट करतात. ज्यामुळे स्किन डॅमेज होते आणि सुरकुत्या दिसू लागतात.
अॅक्ने आणि पिंपल्स
अनेक लोकांना असं वाटतं की,चेहऱ्यावरील तेलकटपणामुळे पिंपल्स आणि अॅक्नेची समस्या वाढते. तुम्हीही असाच विचार करत असाल तर हे अत्यंत चुकीचं आहे. जर तुमची त्वचा फार कोरडी झाली असेल तर या परिस्थितीमध्ये बॅक्टेरिया त्वचेमध्ये प्रवेश करतात परिणामी अॅक्ने आणि पिंपल्सच्या समस्येचा सामना करावा लागतो.
काळे डाग
चेहऱ्यावर मॉयश्चरायझर लावल्याने ते चेहऱ्यावरील सेल्स हेल्दी ठेवण्यासाठी मदत करतं. यामुळे काळ्या डागांची समस्या अजिबात उद्भवत नाही. जर त्वचेवर व्यवस्थित मॉयश्चरायझर नाही लावलं तर काही दिवसांमध्येच तुमच्या चेहऱ्यावर काळे डाग दिसू लागतील. तसेच सुरकुत्यांची समस्याही दिसून येईल.
डल चेहरा
मॉयश्चरायझरच्या कमतरतेमुळे चेहरा डल दिसू लागतो. कारण मॉयश्चरायझर मिळत नसेल तर त्वचा जास्त डॅमेज दिसू लागते. त्यामुळे त्वचेचा रंग काळवंडतो आणि त्वचा डल दिसू लागते.
मेकअप प्रॉब्लेम
मॉयश्चरायझर न लावल्याने त्वचा आधीप्रमाणे मुलायम राहत नाही. अशातच जर तुम्ही स्किनवर मेकअप करत असाल तर तुम्हाला फ्लॉलेस लूक मिळू शकत नाही. तसेच तुमच्या चेहऱ्यावर फाउंडेशन आणि कॉम्पॅक्ट लावल्यानंतर पॅचेस दिसू लागतील.
टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.