ठेवीदारांची १ कोटींची फसवणूक; परळीतील माऊली सोसायटीचे अध्यक्ष आणि सचिव फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 05:46 PM2020-09-12T17:46:46+5:302020-09-12T17:48:41+5:30

येथील स्टेशन रोडवरील जैस्वाल कॉम्प्लेक्समध्ये श्री माऊली मल्टी स्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे कार्यालय होते.

1 crore fraud of depositors; Fugitive President and Secretary of Mauli Society in Parli | ठेवीदारांची १ कोटींची फसवणूक; परळीतील माऊली सोसायटीचे अध्यक्ष आणि सचिव फरार

ठेवीदारांची १ कोटींची फसवणूक; परळीतील माऊली सोसायटीचे अध्यक्ष आणि सचिव फरार

Next
ठळक मुद्दे परळीतील माऊली सोसायटीकडून ठेवीदारांची फसवणूकज्यादा व्याजदाराचे आमिष देऊन ठेवीदारांकडून रक्कम जमा केली

परळी:  ज्यादा व्याजदराचे आमिष दाखवून माऊली सोसायटीमध्ये  रक्कम ठेव स्वरूपात ठेवण्यास प्रवृत्त करून मुदतीनंतर ही ठेवीची रक्कम परत देण्यात आली नाही. यामुळे श्री माऊली मल्टी स्टेट क्रेडिट को-ऑप .सोसायटी च्या चेअरमन व सचिव व अन्य एका विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा परळी शहर पोलीस ठाण्यात शुक्रवारी दाखल करण्यात आला आहे. प्रकरणातील  चेअरमन  व सचिव  हे परळीतून अनेक महिन्यापासून पसार झाले आहेत. सन 2017 ते 2019 दरम्यान 14 ठेवीदारांना  एक कोटी 28 लाख 6 हजार 699 रुपयांना गंडविले  असल्याची तक्रार  परळी शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे 

येथील स्टेशन रोडवरील जैस्वाल कॉम्प्लेक्समध्ये श्री माऊली मल्टी स्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे कार्यालय होते. सोसायटीचे चेअरमन     ओमप्रकाश चंदनलाल जैस्वाल व पतपेढीच्या सचिव - संगीता ओमप्रकाश जैस्वाल या दोघांनी ज्यादा व्याजदराचे आमिष दाखवून सोसायटीमध्ये ठेव ठेवण्यास प्रवृत्त केले अशी तक्रार अरुण मुळे रा. औरंगाबाद यांनी परळी पोलीस ठाण्यात केली आहे. या तक्रारीत मुळे यांनी पुढे असे म्हटले आहे की,17/05/2017  रोजी दोन वर्षासाठी 50 हजार रुपये गुंतवले होते, 2019 मध्ये गुंतवलेली रक्कम व्याजासह मिळालीच नाही तर मुद्दल ही परत मिळाले नाही त्यामुळे पतपेढीच्या येथील कार्यालयात गेलो असता कार्यालयास कुलूप असल्याचे आढळून आले त्यानंतर ही सोसायटी नाशिकच्या विष्णू भागवत यांना वर्ग करण्यात आली. भागवत यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी परळी येथे येऊन ठेवीदारांशी चर्चा केली होती परंतु रक्कम काही मिळाली नाही   असे ही मुळें यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

शहरातील एकूण 14 जणांना एक कोटी 28 लाख 66 हजार 699 एवढी ठेवीची रक्कम न देता या रकमेचा अपहार केला अशा अशी तक्रार अरुण मुळे यांनी केली. त्यांच्या तक्रारी वरून पोलीस ठाण्यात तिघांविरोधात  फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामध्ये ओमप्रकाश जैस्वाल , संगीता जैस्वाल व विष्णू भागवत ( रा. नाशिक)   या तिघांचा समावेश आहे या प्रकरणाचा तपास बीडच्या आर्थिक गुन्हे शाखा करीत  आहेत. याप्रकरणी  अद्याप एकाही आरोपीस पोलिसांनी अटक केलेली नाही.

Web Title: 1 crore fraud of depositors; Fugitive President and Secretary of Mauli Society in Parli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.