अंबाजोगाईत मदतफेरीतून १ लाख १७ हजारांचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:34 AM2021-07-31T04:34:09+5:302021-07-31T04:34:09+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : कोकण व पश्चिम महाराष्ट्रात निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान झाले आहे. आपतीग्रस्त ...

1 lakh 17 thousand from Ambajogai aid round | अंबाजोगाईत मदतफेरीतून १ लाख १७ हजारांचा निधी

अंबाजोगाईत मदतफेरीतून १ लाख १७ हजारांचा निधी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबाजोगाई : कोकण व पश्चिम महाराष्ट्रात निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान झाले आहे. आपतीग्रस्त बांधवांना मदतीचा हात देण्यासाठी विविध सामाजिक संस्थांच्यावतीने अंबाजोगाई शहरातून शुक्रवारी निघालेल्या मदत फेरीत रोख रक्कम १ लाख १७ हजार शंभर व विविध वस्तू व साहित्य जमा झाले.

मदत फेरीतून जमा झालेल्या रकमेचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्यात येणार आहे. तर जमा झालेले साहित्य, कपडे व धान्य मानवलोकच्या माध्यमातून आपत्तीग्रस्त नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत.

रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी, वसुंधरा सेवा प्रतिष्ठान, प्रियदर्शनी क्रीडा व व्यायाम मंडळ, रोटरी इनरव्हील क्लब, व्यापारी संघटना, पेशवा महिला संघटना, सामाजिक कार्यकर्ते यांच्या पुढाकारातून मदतफेरी काढण्यात आली. फेरीत आ.नमिता मुंदडा, नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, वसुंधरा सेवा प्रतिष्ठानचे अक्षय मुंदडा, रोटरीचे अध्यक्ष विवेक गंगणे, सचिव प्रा.रोहिणी पाठक, प्रकल्प संचालक धनराज सोळंकी, उपाध्यक्ष स्वप्नील परदेशी, व्यापारी संघटनेचे पुरुषोत्तम भन्साळी, रोटरी इनरव्हील क्लबच्या अध्यक्ष अंजली चरखा, सचिव मेघना मोहिते, पेशवा महिला संघटनेच्या कल्याणी कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही मदत फेरी निघाली. या मदत फेरीला शहरवासीयांनी उत्स्फूर्त मदत केली. या मदत फेरीत डॉ. नवनाथ घुगे, नगरसेवक महादेव आदमाणे, सुनील व्यवहारे, ॲड. संतोष लोमटे, प्रशांत आदनाक, अनंत अरसुडे, गोपाळ मस्के, अमोल पवार, राहुल कापसे, मयूर रणखांब, महेश आंबाड, सुहास काटे, प्रा.संतोष मोहिते, डॉ.निशिकांत पाचेगावकर, प्रा.अजय पाठक, भागवत कांबळे, विश्वनाथ लहाने, अनिरुद्ध चौसाळकर, गोरख मुंडे, जगदीश जाजू, अरुण असरडोहकर, पुरुषोत्तम रांदड, सचिन कऱ्हाड, अजित देशमुख, राधेश्याम लोहिया, भिमाशंकर शिंदे, प्रा.कल्पना मुळावकर, मंदाकिनी गित्ते, संगीता नावंदर, चंद्रकला देशमुख यांच्यासह महिला व सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

अंबाजोगाई येथील विद्यार्थिनी ऐश्वर्या अनंत अरसुडे हिने आपला बचत गल्ला पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दिला. आ.नमिता मुंदडा व रोटरीच्या सचिव प्रा. रोहिणी पाठक यांच्याकडे ऐश्वर्या हिने सुपूर्द केला. वसुंधरा प्रतिष्ठानच्या माध्यमातून ११ हजार, सामाजिक कार्यकर्त्या नीलिमा अशोक गुंजाळ यांनी पाच हजार रुपयांचा धनादेश रोटरीकडे सुपूर्द केला. तर रोटरीच्या सर्व सदस्यांनी ५२ हजार शंभर रुपयांचा निधी जमा केला.

300721\1624-img-20210730-wa0058.jpg

अंबाजोगाई येथे पूरग्रस्तांसाठी मदत फेरीचे आयोजन करण्यात आले होते

Web Title: 1 lakh 17 thousand from Ambajogai aid round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.