धनेगाव येथे १ लाख ३८ हजारांची देशी-विदेशी दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:36 AM2021-05-20T04:36:51+5:302021-05-20T04:36:51+5:30

बीड : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने १९ मे रोजी केज तालुक्यातील धनेगाव येथे गोपनीय माहितीच्या ...

1 lakh 38 thousand domestic and foreign liquor seized at Dhanegaon | धनेगाव येथे १ लाख ३८ हजारांची देशी-विदेशी दारू जप्त

धनेगाव येथे १ लाख ३८ हजारांची देशी-विदेशी दारू जप्त

Next

बीड : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने १९ मे रोजी केज तालुक्यातील धनेगाव येथे गोपनीय माहितीच्या आधारे धाड टाकली असता त्या ठिकाणाहून १ लाख ३८ हजार रुपये किमतीची देशी-विदेशी दारू जप्त करण्यात आली.

१९ मे रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने युसूफ वडगाव पोलीस स्टेशन हद्दीत धनेगाव, ता. केज येथे एका निनावी पत्र्याच्या शेडमधून दारूचा साठा जप्त केला. आरोपी इसम नामे बालाजी विठ्ठलराव कोथमिरे, (रा. कळंब, जि. उस्मानाबाद) याने लॉकडाऊन कालावधीत देशी-विदेशी मद्याचा साठा विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगून असल्याचे आढळून आले. त्याच्या ताब्यातून राज्य उत्पादन शुल्क विभागाने गोवा राज्य निर्मिती व्हिस्कीच्या १८० मिलीचे १६ बॉक्स व देशी दारू ९० मिली क्षमतेचे ३ बॉक्स व १८० मिली क्षमतेचे ४ बॉक्स असा दारुचा मुद्देमाल जप्त केला.

या कारवाईत जप्त केलेल्या दारूची किंमत एक लाख ३८ हजार इतकी आहे. तसेच आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा,१९४९ चे कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, विभागीय उपायुक्त प्रदीप पवार यांच्या सूचनेनुसार व राज्य उत्पादन शुल्क बीड विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक कडवे, दुय्यम निरीक्षक घोरपडे, जवान नितीन मोरे व सादेक अहमद व जवान-नि-वाहन चालक जारवाल यांनी केली.

सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आला असून सर्व दारू दुकाने बंद आहेत. अशावेळी मद्याची अवैधरित्या विक्री होऊ नये, याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाची पथके जिल्हाभरात करडी नजर ठेवत आहेत.

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून पथके नेमली असून अवैध व‌ बनावट दारू , हातभट्टीची दारू व परराज्यातील दारू विरोधात सातत्याने मोहीम राबविण्यात येत असून यापुढेही अशा कारवाया सुरू राहतील,असे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांनी सांगितले.

===Photopath===

190521\19_2_bed_18_19052021_14.jpeg

===Caption===

धनेगाव येथे १ लाख ३८ हजाराची देशी विदेशी दारू जप्त

Web Title: 1 lakh 38 thousand domestic and foreign liquor seized at Dhanegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.