१० लाख शेतकरी पीक विम्यापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 12:03 AM2019-04-25T00:03:02+5:302019-04-25T00:04:13+5:30
खरीप हंगामातील पिकांसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना २०८-१९ लागू झाली आहे. या योजनेच्या माध्यमातून ४ लाख ३२ हजार ७०३ शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला आहे. मात्र, जवळापास ९ लाख ७८ हजार९१३ शेतकरी पीक विमा योजनेपासून वंचित राहिले आहेत.
बीड: खरीप हंगामातील पिकांसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना २०८-१९ लागू झाली आहे. या योजनेच्या माध्यमातून ४ लाख ३२ हजार ७०३ शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला आहे. मात्र, जवळापास ९ लाख ७८ हजार९१३ शेतकरीपीक विमा योजनेपासून वंचित राहिले आहेत. परंतु, वाटप सुरु असलेला विमा हा कापूस, सोयबिन, तूर, कांदा या पिकांना वगळून दिला जात असल्याचे कृषी विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. पुढील काळात इतर शेतकºयांना देखील विमा योजनेचा लाभ मिळेल. आपले सरकार वेब पोर्टलवरुन विमा भरुन देखील यादीत नाव नसल्यामुळे अनेक शेतकºयांनी कृषी विभागाकडे निवेदनाद्वारे तक्रारी देखील केल्या आहेत.
मागील वर्षी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत मोठ्या प्रमाणात सहभाग घेतल्यामुळे जिल्हा प्रशासनाचा पंतप्रधानांच्या हस्ते सन्मान करण्यात आला होता. शेतकºयांना देखील मोठ्या प्रमाणात या योजनेचा लाभ मिळाला होता. २०१८-१९ या वर्षासाठी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडे या योजनेचे कंत्राट देण्यात आले आहे. पीक विम्याची रक्कम भरताना शेतकºयांनी बँकेच्या माध्यमातून तर अनेक शेतकºयांनी आपले सरकार या पोर्टलद्वारे भरली आहे. मात्र, पोर्टलवरुन विमा भरलेला असताना देखील विम्यापासून अनेक शेतकरी वंचित राहिले आहेत. त्यामुळे भरलेले पैसे गेले कुठे असा सवाल शेतकºयांमधून विचारला जात आहे. याचसंदर्भात काही शेतकºयांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार देखील केली आहे. शेतकºयांच्या तक्रारी निवारण करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आलेली आहे. त्यांच्या माध्यमातून प्रश्न सोडवले जातील अशी माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली. तसेच जिल्हा प्रशासनाने लक्ष घालून सर्व पात्र शेतकºयांना विमा मिळवून द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा शेतकºयांच्या वतीने देण्यात आला आहे.
विमा कंपनीने नेमले प्रतिनिधी
विमा योजनेच्या संदर्भातील तक्रारी निवारण करण्यासाठी किंवा शेतकºयांच्या समस्या सोडवण्यासाठी ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीचे प्रतिनिधी तालुका कृषी कार्यालयात बसणार आहेत. त्या ठिकाणी शेतकºयांनी आपल्या काही तक्रारी असतील तर तेथे संपर्क साधावा असे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे.
दुष्काळी परिस्थितीत शेतकºयांना दिलासा
४खरीप हंगामातील काही पिकांसाठी विमा मंजुर आहे. मात्र, यावर्षी एक ठोक रक्कम जिल्ह्याला मंजुर झाल्याचे कंपनीकडून जाहीर झाले नाही.
४मुख्य पिके सोडून ४ लाख ३२ हजार ७०३ शेतकºयांना जवळपास ११४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
४विम्याचे पैसे तात्काळ शेतकºयांच्या खात्यावर जमा करण्यात यावे. तसेच कापूस, सोयबीन, तूर यांसह इतर पिकांचा विमा देखील मंजूर करण्यात यावा अशी मागणी शेतकºयांमधून होत आहे.