कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात १०० खाटांचे कोविड केअर सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:33 AM2021-04-21T04:33:24+5:302021-04-21T04:33:24+5:30
धारूरमध्ये १६० बेडचे कोविड केअर सेंटर सुरू आहे. तेथील रुग्णसंख्या क्षमतेनुसार पूर्ण झाल्याने कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात १०० खाटांचे ...
धारूरमध्ये १६० बेडचे कोविड केअर सेंटर सुरू आहे. तेथील रुग्णसंख्या क्षमतेनुसार पूर्ण झाल्याने कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात १०० खाटांचे कोविड केअर सेंटर मंजूर झाले असून, येथे १४ कर्मचारी नियुक्त करण्यात येत आहेत. शासनामार्फत वैद्यकीय सेवा येथे मोफत दिली जाणार आहे. या कोविड केअर सेंटरमध्ये गंभीर रुग्णांसाठी पाच ऑक्सिजन बेडची स्वतंत्र सुविधा करण्यात येणार आहे. अशा संकट काळात आपली सामाजिक जबाबदारी म्हणूण आडसकर यांनी पुढाकार घेत या कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांची निवास व्यवस्था, भोजन, नाष्टा व इतर अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. या केअर सेंटरची स्वच्छता व साफसफाई करण्यात आली. दोन दिवसांपासून आडसकर हे स्वतः केअर सेंटरवर व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी लक्ष ठेवून आहेत. यावेळी बाजार समितीचे उपसभापती सुनील शिनगारे, विनायक शिनगारे व सहकारी उपस्थित होते.