अंबाजोगाईच्या 'स्वाराती' महाविद्यालयास १०० खाटांचे क्रिटीकल केअर रुग्णालय मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 06:43 PM2022-11-22T18:43:20+5:302022-11-22T18:43:32+5:30

स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात २५०० मी क्षेत्रात चार कोटी रुपये खर्चून दोन मजली क्रिटीकल केअर हॉस्पिटलसाठी नवी इमारत उभारण्यात येणार आहे.

100 bedded critical care hospital approved for 'SRT' medical college of Ambajogai | अंबाजोगाईच्या 'स्वाराती' महाविद्यालयास १०० खाटांचे क्रिटीकल केअर रुग्णालय मंजूर

अंबाजोगाईच्या 'स्वाराती' महाविद्यालयास १०० खाटांचे क्रिटीकल केअर रुग्णालय मंजूर

Next

अंबाजोगाई (बीड) : येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयास केंद्र शासनाच्या पंतप्रधान एबीएचआयएम या योजनेअंतर्गत १०० बेडचे क्रिटीकल केअर हॉस्पिटल मंजूर करण्यात आले आहे. हॉस्पिटल निर्मितीसाठी तातडीने नवीन इमारत उभी करण्यात यावी, अशा सुचना राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य सेवा व अभियान संचालक कार्यालयाच्या वतीने अधिष्ठाता कार्यालयास मिळाल्या आहेत.

राष्ट्रीय आरोग्य अभियान विभागाच्या आयुक्त आरोग्य सेवा व अभियान संचालक कार्यालयाच्या वतीने दिनांक १६ नोव्हेंबर २०२२ रोजीच्या संदर्भीय पत्रानुसार कळविण्यात आले आहे की, वित्तीय वर्षे २०२२-२३ मध्ये केंद्र शासन पुरस्कृत पीएम एबीएचआय एम या योजने अंतर्गत स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई येथे क्रिटिकल केअर हॉस्पिटल मंजूर झाले आहे. या हॉस्पिटलच्या नवीन बांधकामासाठी महाविद्यालय व रुग्णालयाच्या आवारात २५०० चौरस मिटर जागा आवश्यक आहे. सदरील इमारत उभारणीसाठी साइट असाएसमेंट पूर्ण करण्याच्या दृष्टीने सदरील जागा त्वरीत उपलब्ध करुन देण्यासंदर्भात कळवण्यात आले आहे. सदरील योजनेकरीता जेपीड़गो ही डेव्हलपमेंट पार्टनर संस्था तांत्रिक बाबतीत मदत करणार आहे. त्यांच्या तंत्राच्या मदतीने मंजूर ठिकाणी भेट देवून पायाभुत सुविधा विकास कक्ष यां पीआर तयार करून सदर क्रिटीकल केअर हॉस्पिटल अंदाज पत्रक तयार करुन बांधकाम करण्यात येणार आहे.

चार कोटीची होणार नवी इमारत: 
स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात २५०० मी क्षेत्रात चार कोटी रुपये खर्चून दोन मजली क्रिटीकल केअर हॉस्पिटलसाठी नवी इमारत उभारण्यात येणार आहे.

१०० बेडची होणार व्यवस्था
या क्रिटिकल केअर हॉस्पिटलमध्ये ग्राउंड फ्लोअरला ५० बेड तर फस्ट फ्लोअर ला ५० बेड अशी एकूण १०० बेडची व्यवस्था करण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक फ्लोअरवर १० बेडचा आयसीयू झोन (पीडियाट्रीक साठी दोन बेड आरक्षीत), सहा बेडचा एचडी झोन ( पीडियाट्रिक साठी दोन बेड आरक्षीत ), २५ बेडचा आयसोलेशन वॉर्ड, दोन स्वतंत्र रूम, दोन बेडची डायलेसिस रुम, दोन बेडची एमसीएच रूम, ५ बेड ची इमरजन्सी रुम, डॉक्टर, परिचारीका, औषध सामग्री, स्वच्छता व इतर आवश्यक बाबीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे...

जागेची पाहणी पूर्ण
केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत उभारण्यात येणाऱ्या या क्रिटिकल केअर हॉस्पिटलच्या नवीन इमारत उभारणीसाठी जागेची पाहणी पूर्ण झाली आहे. नव्याने बांधण्यात येणाऱ्या बाहय रुग्ण सेवा विभागाच्या शेजारील मोकळी जागा व इतर जागा संबंधीचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. क्रिटिकल केअर हॉस्पिटल उभारणीसाठीची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

Web Title: 100 bedded critical care hospital approved for 'SRT' medical college of Ambajogai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.