जिल्हा परिषदेकडून जिल्हा रुग्णालयास १०० ऑक्सिजन जम्बो सिलिंडर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:27 AM2021-05-03T04:27:53+5:302021-05-03T04:27:53+5:30

बीड : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा, सर्व पदाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व अन्य सर्व अधिकारी तसेच जिल्हा परिषदेशी ...

100 Oxygen Jumbo Cylinder from Zilla Parishad to District Hospital | जिल्हा परिषदेकडून जिल्हा रुग्णालयास १०० ऑक्सिजन जम्बो सिलिंडर

जिल्हा परिषदेकडून जिल्हा रुग्णालयास १०० ऑक्सिजन जम्बो सिलिंडर

Next

बीड : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा, सर्व पदाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व अन्य सर्व अधिकारी तसेच जिल्हा परिषदेशी संलग्न अभियंत्यांनी लोकसहभागातून बीड जिल्हा रुग्णालयास १०० ऑक्सिजन जम्बो सिलिंडर देण्याचा निर्धार केला आहे. त्यानुसार रविवारी ५७ जम्बो सिलिंडर जिल्हा रुग्णालयास सुपूर्द करण्यात आले आहेत. तर उर्वरित ४३ सिलिंडरदेखील लवकरच उपलब्ध करून देण्यात येतील, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी दिली.

पालकमंत्री धनंजय मुंडे, जि. प. अध्यक्षा शिवकन्या सिरसाट, जि. प. उपाध्यक्ष बजरंग सोनवणे, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्या संकल्पनेतून ही बाब साकारली आहे. शासकीय आयटीआय येथेही आणखी एक कोविड केअर सेंटर उभारण्यात येणार आहे, त्यासाठीही या सिलिंडरचा उपयोग होणार आहे.

एकीकडे रुग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा आहे तर दुसरीकडे विविध जनरेशन प्लांटवर तसेच आयात केलेल्या ठिकाणी ऑक्सिजन भरून ठेवण्यासाठी सिलिंडर कमी पडत आहेत. अशा परिस्थितीत हे ५७ जम्बो सिलिंडर निश्चितच आरोग्य यंत्रणांसाठी फायदेशीर ठरणार आहेत, आणखी ४३ जम्बो सिलिंडर लवकरच उपलब्ध करून देऊ; असे जि. प. अध्यक्षा शिवकन्या सिरसाट यांनी सांगितले.

जिल्हा परिषद प्रांगणात शनिवारी हे ५७ जम्बो सिलिंडर जिल्हा रुग्णालयास सुपूर्द करण्यात आले, यावेळी जि. प. अध्यक्षा शिवकन्या सिरसाट, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, महिला व बालकल्याण समिती सभापती यशोदाताई जाधव, कृषी व पशु संवर्धन समिती सभापती सविताताई मस्के, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते, शिवाजीराव सिरसाट, बाळासाहेब मस्के, जि.प. सदस्य अशोक लोढा, विठ्ठल थडके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप काकडे, रामेश्वर मुंडे, भागवत औताडे, रणजित क्षीरसागर आदी उपस्थित होते.

===Photopath===

020521\02_2_bed_32_02052021_14.jpeg

===Caption===

जिल्हा परिषदेकडून जिल्हा रुग्णालयास १०० ऑक्सिजन जम्बो सिलिंडर

Web Title: 100 Oxygen Jumbo Cylinder from Zilla Parishad to District Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.