बीड जि.प.मध्ये १०२ विनंती तर २१ प्रशासकीय बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 12:21 AM2019-06-03T00:21:43+5:302019-06-03T00:22:22+5:30
येथील जिल्हा परिषदेच्या स्तरावरील गट क कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय आणि विनंती बदल्या ३१ मे व १ जून रोजी समूपदेशनाने पार पडल्या.
बीड : येथील जिल्हा परिषदेच्या स्तरावरील गट क कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय आणि विनंती बदल्या ३१ मे व १ जून रोजी समूपदेशनाने पार पडल्या.
येथील स्काऊट भवन येथे सर्व संवर्गातील कर्मचाºयांच्या उपस्थितीत ही प्रक्रि या पारदर्शीपणे पार पडली.
यावेळी जवळपास सर्व कर्मचा-यांना त्यांच्या मनाप्रमाणे पदास्थापना मिळाल्या.
१५ मे २०१४ च्या शासन निर्णयानुसार १० वर्ष एका तालुक्यात वास्तव्य करणारे कर्मचारी प्रशासकीय बदलीस पात्र असतात.परंतु विधवा,कुमारिका,अपंग,५३ वर्षावरील कर्मचा-यांना यातून सूट दिली जाते.
या वेळी २१ प्रशासकीय बदल्या, १०२ विनंती बदल्या, ९ आपसी बदल्या करण्यात आल्या. विभाग पदे आणि संख्या पुढीलप्रमाणे आरोग्य विभाग - आरोग्य सेवक महिला १३, आरोग्य सहायक महिला १, आरोग्य सेवक पुरुष ६, आरोग्य सहायक पुरुष २, औषध निर्माता ३ , पशुसंवर्धन विभाग -सहा. पशुविकास अधिकारी २, पशुधन पर्यवेक्षक १३, कृषी विभाग विस्तार अधिकारी १, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग -वीजतंत्री १, महिला व बालकल्याण विभाग - अंगणवाडी पर्यवेक्षिका ४, बांधकाम विभाग ४, स्थापत्य अभि. सहायक ८, शिक्षण विभाग -केंद्रप्रमुख -४, विस्तार अधिकारी २, मुख्याध्यापक वर्ग -३, पंचायत विभाग - ग्रामसेवक १९, ग्रा. विस्तार अधिकारी २, विस्तार अधिकारी पंचायत १,सामान्य प्रशासन विभाग - सहायक प्रशासन अधिकारी १, कनिष्ठ प्रशासन अधिकारी २, विस्तार अधिकारी १, वरिष्ठ सहायक ११, कनिष्ठ सहायक २५, वित्त विभाग - कनिष्ठ लेखा अधिकारी १, कनिष्ठ सहायक लेखा २ याप्रमाणे १३२ कर्मचाºयांच्या बदल्या झाल्या आहेत. या पारदर्शी प्रक्रियेमुळे सर्व अधिकारी कर्मचा-यांना इच्छितस्थळी बदल्यामुळे त्यांच्यामध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले.
विविध बदलीचे निकष : प्राधान्यक्रम
४७ मार्च २०१९ च्या शासन निर्णयानुसार एका तालुक्यात ३ वर्ष सेवा झालेले कर्मचारी विनंती बदलीस पात्र ठरतात.यामध्येही अपंग,विधवा,पती पत्नी इत्यादींना प्राधान्यक्र म दिला जातो. बीड येथे झालेल्या या बदली प्रक्रियेदरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांच्यासह सर्व संबंधित विभागप्रमुख उपस्थित होते.