पकडलेल्या टेम्पोत रेशनचे १०५ क्विंटल धान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:33 AM2021-07-29T04:33:09+5:302021-07-29T04:33:09+5:30
आष्टी : रेशन दुकानांवर गोर-गरीब नागरिकांना अल्प दरात पुरविण्यात येणारा गहू, तांदूळसह इतर धान्य असा एकूण १०५ ...
आष्टी : रेशन दुकानांवर गोर-गरीब नागरिकांना अल्प दरात पुरविण्यात येणारा गहू, तांदूळसह इतर धान्य असा एकूण १०५ क्विंटल धान्य काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जाणारा टेम्पो पोलिसांनी सोमवारी पहाटे आष्टीतील किनारा चौकात ताब्यात घेतल्यानंतर चौकशी करण्यात आली. या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्वस्त धान्य दुकानाचे धान्य काळ्या बाजारात विक्रीसाठी टेम्पोतून नेले जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून आष्टी पोलिसांनी सोमवारी पहाटे किनारा चौकात टेम्पो पकडला होता. हा टेम्पो (एम. एच. १६, एइ ९६१६) नेकनूर येथील असून, चालक शेख जैनोद्यीन शेख अल्लाउद्दीन याला ताब्यात घेण्यात आले आहे. टेम्पोची झडती घेतली असता त्यातील गहू, तांदूळ सार्वजनिक वितरण प्रणालीतील असल्याने आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पी.एस.आय. प्रमोद काळे हे करीत आहेत.
चौकट
टेम्पोमधील धान्य
गहू ११ कट्टे, तांदूळ ७७, चिंच ५, येरंडी १४, बाजरी १०, ज्वारी १८, हरभरा ३४, तूर १३, मटकी २ असे एकूण १८४ कट्टे १०५.७९ क्विंटल मालाचा पंचनामा आष्टी तहसीलचे पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार महादेव पंढरपुरे व अव्वल कारकून टी. बी. पठाडे यांनी करून हे धान्य आष्टी येथील शासकीय गोदामात जमा केले आहे.
280721\img-20210728-wa0300_14.jpg