जिल्ह्यात कोरोनाकाळात १०७ अल्पवयीन मुली बेपत्ता !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:35 AM2021-09-19T04:35:10+5:302021-09-19T04:35:10+5:30
बीड : जिल्ह्यात अल्पवयीन मुली अन् मुलेही सुरक्षित नाहीत. अल्पवयीन मुलांविरुद्धच्या गुन्ह्यांचा आकडा थक्क करणारा आहे. २०२० मध्ये कोरोनाकाळात ...
बीड : जिल्ह्यात अल्पवयीन मुली अन् मुलेही सुरक्षित नाहीत. अल्पवयीन मुलांविरुद्धच्या गुन्ह्यांचा आकडा थक्क करणारा आहे. २०२० मध्ये कोरोनाकाळात सुमारे १०७ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या. यासोबतच १५ अल्पवयीन मुलेही गायब झाली. १८ वर्षांखालील मुला-मुली बेपत्ता झाल्यावर पोलीस ठाण्यात थेट अपहरणाचा गुन्हा नोंद होतो. दरम्यान, प्रेमप्रकरणातून फूस लावून पळवून नेण्याची प्रकरणे अधिक आहेत. कोरोनाकाळात कडक निर्बंध होते. मात्र, अशा परिस्थितीही बेपत्ता मुलींचा आकडा शंभरहून अधिक आहे.
२०२० मध्ये ७९ मुलींवर अत्याचार
अपहरण: १०७
बलात्कार : ७९
विनयभंग : ५३
.....
जिल्ह्यातील एकूण बेपत्ता
५७२
मुले
१५
मुली
१०७
.....
०१ मुलीचाच लागला नाही शोध
अल्पवयीन मुली व मुले बेपत्ता झाल्यानंतर अपहरणाचा गुन्हा नोंद करून जलदगतीने तपास केला जातो. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने देखील त्यांचा शोध घेण्यात येतो. २०२० मध्ये बेपत्ता झालेल्यांपैकी एका अल्पवयीन मुलीसह एका मुलाचा शोध घेण्यात पोलिसांना यश आलेले नाही.
....
७० टक्के कैदी तरुण
जिल्हा कारागृहात दाखल होणाऱ्या न्यायालयीन कोठडीतील आरोपींपैकी ७० टक्के आरोपी हे २० ते ३५ वयोगटातील आहेत. यापैकी ६० टक्के तरुण बेरोजगार असतात. कुसंगत व भविष्याबद्दलच्या बेपर्वाईतून काहीजण अल्पवयातच गुन्हेगारीकडे वळत असल्याचे समोर आले आहे.
...
मुला- मुलींवर पालकांनी योग्य संस्कार केले पाहिजेत. चूक काय व बरोबर काय याची जाणीव करून द्यायला हवी, याशिवाय त्यांच्याशी संवाद वाढविणे गरजेचे आहे. मुलांची पाऊले चुकीच्या दिशेने पडणार नाहीत यादृष्टीने प्रयत्न हवेत.
- आर. राजा, पोलीस अधीक्षक, बीड.
....