१०८ रुग्णवाहिकेची २४ तास सेवा तत्पर; सर्वांत जास्त कॉल अपघात प्रसूतीचे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 18:37 IST2025-02-03T18:37:01+5:302025-02-03T18:37:30+5:30
. प्रत्येक रुग्णवाहिकेत डॉक्टरसह चालक असतो. कॉल येताच ते रुग्णाच्या मतदीसाठी धावत असतात.

१०८ रुग्णवाहिकेची २४ तास सेवा तत्पर; सर्वांत जास्त कॉल अपघात प्रसूतीचे
बीड : १०८ रुग्णवाहिकांना सर्वांत जास्त कॉल हे गर्भवतींसाठीचे असल्याचे समोर आले आहे. एखाद्या मातेला कळा सुरू होताच नातेवाईक रुग्णवाहिकेला कॉल करतात. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये धाव घेत रुग्णवाहिका या गर्भवतीला रुग्णालयात सुखरूप पाेहोच करते. ही सेवा २४ तास सुरूच असते.
साधारण २०१४ साली १०८ ही रुग्णवाहिका सामान्यांच्या सेवेत धावत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत दोन लाख ५२ हजार ५३१ रुग्णांना याचा लाभ मिळाला आहे. आतापर्यंत तरी ही रुग्णवाहिका सामान्यांसाठी संजीवनी ठरली आहे. प्रत्येक रुग्णवाहिकेत डॉक्टरसह चालक असतो. कॉल येताच ते रुग्णाच्या मतदीसाठी धावत असतात.
१०८ नंबरवर २४ तास सेवा
ही सेवा २४ तास सुरू असते. आपत्कालीन स्थितीत तातडीने उपचार मिळावेत, यासाठी शासनाने १०८ क्रमांकाची मोफत रुग्णवाहिका सेवा सुरू केली आहे.
जिल्ह्यात किती १०८ रुग्णवाहिका?
जिल्ह्यात १०८ च्या एकूण १९ रुग्णवाहिका आहेत. यात आधुनिक लाइफ सपोर्टच्या ५, तर बेसिक लाइफ सपोर्टच्या १४ रुग्णवाहिका आहेत.
१०८ रुग्णवाहिकेतून कोणत्या सेवा
जिल्ह्यात सर्व प्रकारच्या सेवा दिल्या जातात. यात अपघात, हल्ला, भाजलेले, ह्रदय रोग, पडलेले, विषबाधा, प्रसूति, वीज, अपघात, वैद्यकीय इतर रूग्ण, गंभीर जखमा, आत्महत्या आदी सेवा यातून दिल्या जातात.
किती रुग्णांना सेवा
रुग्ण - २५२५३१
अपघात - १२०७२
हल्ला - २६७८
जळणे - ६४६
ह्रदयरोग - १८५६
पडलेले - ३०८३
विषबाधा - ६२१८
आत्महत्या - १९३
प्रसूती - ५७७४०
वीज अपघात - २२५
सामूहिक हानी - १३४२
वैद्यकीय - १३४३१४
इतर - २४९५३
खुप दुखापत असलेले - ७२११
कोरोना - १४८११
रुग्णवाहिकेत प्रसूती - १४३९
डॉक्टरांसह रुग्णवाहिका उपलब्ध
गरजू रुग्णांना मोफत आपत्कालीन सेवा मिळावी हेच आमचे ध्येय आहे. नागरिकांनी टोल फ्री १०८ क्रमांकावर संपर्क साधावा. त्यानंतर तत्काळ डॉक्टरांसह रुग्णवाहिका उपलब्ध होते.
- अविनाश राठोड, जिल्हा समन्वयक बीड