११ सशस्त्र दरोडेखोर सीसीटीव्हीत कैद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:32 AM2021-09-13T04:32:46+5:302021-09-13T04:32:46+5:30
नांदूरघाट : दरोड्याच्या उद्देशाने नांदूरघाट (ता. केज) येथे ११ सशस्त्र दरोडेखोर दाखल झाले. मात्र, त्यांचा डाव यशस्वी होऊ शकला ...
नांदूरघाट : दरोड्याच्या उद्देशाने नांदूरघाट (ता. केज) येथे ११ सशस्त्र दरोडेखोर दाखल झाले. मात्र, त्यांचा डाव यशस्वी होऊ शकला नाही. दरोडेखोर रस्त्याने धावताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. यामुळे गावासह परिसरात दहशत निर्माण झाली असून भीतीचे वातावरण आहे. नांदूरघाट येथील चौकातील एका व्यापाऱ्याच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दरोडेखोर धावताना दिसत आहेत. त्यांच्या अंगात काळे कपडे असून हातात कुऱ्हाड, कोयते अशी धारदार शस्त्रे आहेत. ऐन गणेशोत्सवात गावात दरोडेखोर आल्याचे यामुळे स्पष्ट झाले असून सणासुदीचे दिवस असल्याने गावकरी काळजीत आहेत. हे दरोडेखोर गुन्हा करण्याच्या उद्देशानेच आले असावेत, असा संशय असून फुटेजवरून त्यांची ओळख पटविण्यासाठी पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे.
....
पोलिसांची गावात धाव
या घटनेची माहिती मिळाल्यावर १२ सप्टेंबर रोजी केज ठाण्याचे सहायक निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी गावात धाव घेतली. नांदूरघाट व परिसरात गस्त घालून परिसरातील गुन्हेगारी वस्त्यांची तपासणी करण्यात आली. ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करा, घाबरू नका, सतर्क रहा, असे आवाहन शंकर वाघमोडे यांनी केले आहे.
...
120921\12bed_14_12092021_14.jpg
पोलिसांनी नांदूरघाट गावात भेट