११ खुल्या जागांवर होणार बगीचा

By Admin | Published: May 26, 2017 12:25 AM2017-05-26T00:25:53+5:302017-05-26T00:27:08+5:30

बीड : शहरातील विविध वस्त्यालगतच्या रिकाम्या जागेत केंद्र शासनाच्या अमृत वन योजनेंतर्गत उद्यान करण्याच्या प्रस्तावाला गुरुवारी नगर विकास खात्याची मंजुरी मिळाली.

11 will be open to the public seats | ११ खुल्या जागांवर होणार बगीचा

११ खुल्या जागांवर होणार बगीचा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : शहरातील विविध वस्त्यालगतच्या रिकाम्या जागेत केंद्र शासनाच्या अमृत वन योजनेंतर्गत उद्यान करण्याच्या प्रस्तावाला गुरुवारी नगर विकास खात्याची मंजुरी मिळाली. यामुळे शहरातील एकूण ११ ओपन प्लेसवर उद्यान उभारण्याचा उपक्रम हाती घेण्यात येणार असून, यासाठी ८९ लाख रूपये निधी मंजूर झाला असल्याचे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी सांगितले.
२०१५-१६ मध्ये बीड पालिकेने नगर विकास खात्याकडे शहरातील रिकाम्या जागेमध्ये उद्यान उभारण्याचा प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावाचा पाठपुरावा आ. जयदत्त क्षीरसागर यांनी वेळोवेळी केल्यामुळे अखेर हे काम मार्गी लागले आहे. या उपक्रमामुळे शहरातील पर्यावरण सुरक्षित राहण्याला हातभार लागणार आहे.
केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियानाची अंमलबजावणी संदर्भाधीन शासन निर्णयान्वये सन २०१५-१६ वर्षापासून राज्यामध्ये करण्यात येत असून, सदर अभियानांतर्गत पाणी पुरवठा, मलिनस्सारण, पर्जन्यजलवाहिनी, नागरी परिवहन व हरित क्षेत्र विकास इत्यादी पायाभूत सुविधांची निर्मीती शहरामध्ये करण्यात येणार आहे. त्यानूसार सदर अभियानांतर्गत सन २०१५-१६ या आर्थिक वर्षाच्या राज्य वार्षिक कृति आराखड्यास केंद्र शासनाने मान्यता दिलेली असून, सदर आराखड्यामध्ये बीड शहराच्या हरित क्षेत्र प्रकल्पाचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे शहर विकासात एक पाऊल पुढे टाकणार
आहे.

Web Title: 11 will be open to the public seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.