आजोळ परिवारास वृक्षारोपणासाठी दिली १११ झाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:34 AM2021-07-31T04:34:18+5:302021-07-31T04:34:18+5:30
गेवराई : निराधार, वृद्ध, दिव्यांग, मतिमंद, अंधांसह विविध नागरिकांची सेवा करणाऱ्या राक्षसभवन (तांब्याचे) येथील आजोळ परिवारास आधार ...
गेवराई : निराधार, वृद्ध, दिव्यांग, मतिमंद, अंधांसह विविध नागरिकांची सेवा करणाऱ्या राक्षसभवन (तांब्याचे) येथील आजोळ परिवारास आधार माणुसकीचा या ग्रुपच्यावतीने वृक्षारोपणासाठी १११ झाडे शुक्रवारी भेट दिली.
निराधार,वृद्ध, दिव्यांग, मतिमंद, अंध व रस्त्यावर भटकणाऱ्या व अहोरात्र काम करणाऱ्या राक्षसभुवन (तांब्याचे) येथील कर्णराज तांबे यांच्या आजोळ परिवारात वृक्षारोपण व पर्यावरण संतुलित ठेवण्यासाठी आधार माणुसकी ग्रुपचे संचालक पोलीस अंमलदार रणजित पवार व टीमच्या वतीने शुक्रवारी वड, पिंपळ, करंज, चिंच, लिंब, सप्तपर्णी, गुलमोहरासह विविध प्रकारचे जवळपास १११ झाडे देण्यात आली. यावेळी आधार माणुसकी ग्रुपचे रणजित पवार, अमोल वैद्य, सखाराम शिंदे, किरण बेदरे, रामनाथ बेदरे, नारायण खटाणे, नितीन राठोड, सुमित करंजकर, अमित वैद्य उपस्थित होते.
300721\img_20210730_122848_14.jpg