रामगाव परिसरात वडाची १११ झाडे लावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:35 AM2021-08-23T04:35:47+5:302021-08-23T04:35:47+5:30
यावर्षी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनअभावी होणारे रुग्णांचे हाल सर्वांना दिसले आहेत. वातावरणातील नैसर्गिक प्राणवायूचे प्रमाण वाढविण्यासाठी रामगावात एक निसर्गरम्य ...
यावर्षी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनअभावी होणारे रुग्णांचे हाल सर्वांना दिसले आहेत. वातावरणातील नैसर्गिक प्राणवायूचे प्रमाण वाढविण्यासाठी रामगावात एक निसर्गरम्य वातावरण तयार व्हावे म्हणून झाडे लावण्याचे नियोजन करण्यात आले. रस्त्याची एक बाजू पूर्णपणे साफ करण्यात आली. त्यानंतर खड्डे खोदून त्यामध्ये रविवारी वृक्षारोपण करण्यात आले. संपूर्ण झाडांना पाणी टाकून संगोपन करण्याची जबाबदारी सर्व ग्रामस्थांनी घेतली.
यावेळी सरपंच अंगदराव कटके, सहायक उपनिरीक्षक राजाभाऊ राठोड, उपसरपंच रोशनकुमार राठोड, ग्रामपंचायत सदस्य भीमराव राठोड, एकनाथ माळेकर, बालासाहेब कटके, अनिल राठोड, शरद दळवी, दगडू सोळंके, भागवत इंगळे, दिलीप राठोड, अजित कटके, सुरेश पौळ, संदीप सोळंके, मारुती गायकवाड, बाबादेव कटके, अशोक भांगे, अमोल दळवी, दत्ता इंगळे, अजित राठोड यांची उपस्थिती होती. वृक्षारोपणासाठी भीमराव दळवी, सर्जेराव कटके यांनी विशेष परिश्रम घेतले.
220821\save_20210822_153052_14.jpg