बीड जिल्ह्यातील १ हजार ११२ सेवानिवृत्त गुरूजींना दिलासा, सात कोटी मिळणार

By अनिल भंडारी | Published: February 14, 2024 07:20 PM2024-02-14T19:20:06+5:302024-02-14T19:20:15+5:30

सातवा वेतन आयोग फरक हप्ते, मेडिकल व इतर थकीत बिलांचा समावेश

1112 retired teacher in Beed district will get relief, 7 crores will be distributed | बीड जिल्ह्यातील १ हजार ११२ सेवानिवृत्त गुरूजींना दिलासा, सात कोटी मिळणार

बीड जिल्ह्यातील १ हजार ११२ सेवानिवृत्त गुरूजींना दिलासा, सात कोटी मिळणार

बीड : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील आस्थापनेवरील १११२ सेवानिवृत्त गुरूजींना अखेर दिलासा मिळाला असून, अनेक दिवसांपासूनची त्यांची प्रतीक्षा संपली आहे. या शिक्षकांना सातव्या वेतन आयोगाचा फरक हप्ता, वैद्यकीय बिले तसेच थकीत बिलांची रक्कम लवकरच मिळणार आहे. जिल्हा परिषद वित्त विभाग आणि शिक्षण विभागाने ही कार्यवाही केली.                                                  

७ कोटी ४७ लाख रुपये अदा
बीड जिल्ह्यातील १११२ सेवानिवृत्त शिक्षकांच्या वेतन आयोगाचा हप्ता, वैद्यकीय प्रतिपूर्ती, महागाई भत्त्याच्या थकीत बिलापोटी ७ कोटी ४७ लाख १९ हजार ४७३ रुपये अदा करण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक दिवसांपासूनचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला आहे.

Web Title: 1112 retired teacher in Beed district will get relief, 7 crores will be distributed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.