१,१८४ कोरोनामुक्त, १,११८ नवे रूग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:35 AM2021-05-18T04:35:04+5:302021-05-18T04:35:04+5:30
जिल्ह्यात रविवारी ४ हजार ४०३ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्याचे अहवाल सोमवारी दुपारी प्राप्त झाले. यात ३ ...
जिल्ह्यात रविवारी ४ हजार ४०३ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्याचे अहवाल सोमवारी दुपारी प्राप्त झाले. यात ३ हजार २८५ अहवाल निगेटिव्ह आले तर १,११८ अहवाल पॉझिटिव्ह आले. बाधित रुग्णांमध्ये बीड तालुक्यात सर्वाधिक ३३०, अंबाजोगाई ६७, आष्टी ९६, धारुर ८०, गेवराई ८६, केज १०५ माजलगाव ९६, परळी ३५, पाटोदा १२५, शिरुर ६६ आणि वडवणी तालुक्यातील ३२ रूग्णांचा समावेश आहे. सोमवारी जुन्या २६ व २४ तासातील ७ अशा एकूण ३३ मृत्यूंची नोंद आरोग्य विभागाच्या पोर्टलवर झाली. आता एकूण बाधितांचा आकडा ७५ हजार ५४० इतका झाला आहे. कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ६७ हजार ७८५ इतकी झाली आहे तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १,४५६ इतकी झाली आहे. सध्या ६ हजार २९९ रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती सीईओ अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. पी. के. पिंगळे यांनी दिली.