खत खाल्ल्याने १२ शेळ्यांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 12:17 AM2018-11-25T00:17:09+5:302018-11-25T00:17:56+5:30
शेतात डुकरांसाठी टाकलेले खत (थायमेट) खाल्याने एका शेतकऱ्याच्या बारा शेळ्या मृत्यूमुखी पडल्याची घटना तालुक्यातील केकतपांगरी येथे शनिवारी दुपारी घडली. लाखो रूपयांचे नुकसान या शेतकºयाचे झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गेवराई : शेतात डुकरांसाठी टाकलेले खत (थायमेट) खाल्याने एका शेतकऱ्याच्या बारा शेळ्या मृत्यूमुखी पडल्याची घटना तालुक्यातील केकतपांगरी येथे शनिवारी दुपारी घडली. लाखो रूपयांचे नुकसान या शेतकºयाचे झाले आहे.
केकतपांगरी येथील शेतकरी लक्ष्मण बाबूराव डोंगरे यांच्याकडे तेरा शेळ्या होत्या. त्यांनी या शेळ्यांना शनिवार रोजी चारण्यासाठी शेतात नेले होते. शेतात डुकरांसाठी थायमिठ टाकलेले होते. या शेतात शेळ्या चरत असताना ते थायमिठ त्यांच्या खाण्यात आले. यामुळे त्यांना विषबाधा झाली. यामध्ये बारा शेळ्यांचा मृत्यू झाला तर एका शेळीला अस्वस्थ झाले. यामध्ये डोंगरे यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. प्रशासनांकडून या घटनेचा पंचनामा करून शेतकºयाला मदत द्यावी, अशी मागणी सर्वसामान्यांमधून होत आहे.