१२३ कोरोनामुक्त, १४३ नवे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:24 AM2021-07-16T04:24:26+5:302021-07-16T04:24:26+5:30

बीड : गुरुवारी जिल्ह्यात कोरोनाचे नवे १४३ रुग्ण आढळले. दरम्यान, २४ तासात एका मृत्यूची नोंद आरोग्य विभागाच्या पोर्टलवर झाली. ...

123 coronary free, 143 new patients | १२३ कोरोनामुक्त, १४३ नवे रुग्ण

१२३ कोरोनामुक्त, १४३ नवे रुग्ण

googlenewsNext

बीड : गुरुवारी जिल्ह्यात कोरोनाचे नवे १४३ रुग्ण आढळले. दरम्यान, २४ तासात एका मृत्यूची नोंद आरोग्य विभागाच्या पोर्टलवर झाली. १२३ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

बुधवारी जिल्ह्यातील ४ हजार ३९८ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. यात १४३ पॉझिटिव्ह तर, ४ हजार २५५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात ३, आष्टी ३७, बीड २३, धारुर ९, गेवराई १४, केज ९, माजलगाव ४, परळी ४, पाटोदा ३१, शिरुर ४ आणि वडवणी तालुक्यातील पाच जणांचा समावेश आहे. चोवीस तासात एका मृत्यूची नोंद आरोग्य विभागाच्या पोर्टलवर झाली. यात रांजनगाव (ता. बीड) येथील ६० वर्षीय महिलेचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत २,५६६ जणांचा मृत्यू झाला आहे, तर एकूण बाधितांची संख्या ९४ हजार २७६ इतकी झाली आहे. यापैकी ९० हजार ४७७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या १२३३ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांनी दिली.

म्युकरमायकोसिसचे ७८ रुग्ण बरे झाले

म्युकरमायकोसिस या काळ्या बुरशीच्या आजाराची रुग्णसंख्या गुरुवारी स्थिर राहिली. एकूण रुग्णसंख्या १९७ इतकी झाली आहे. यापैकी ७८ जण उपचार घेऊन बरे झाले, तर ७३ जणांवर उपचार सुरू आहेत. ३४ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

Web Title: 123 coronary free, 143 new patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.