१२६ रुग्णांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 12:39 AM2019-02-10T00:39:50+5:302019-02-10T00:40:39+5:30
दुष्काळी परिस्थितीची दाहकता लक्षात घेता आनंद सुतार मित्र मंडळाच्या वतीने गेवराई शहरात मोफत आरोग्य तपासणी शिबीर व मोफत गोळ्या औषधी वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेकांनी यांचा लाभ घेतला.
गेवराई : दुष्काळी परिस्थितीची दाहकता लक्षात घेता आनंद सुतार मित्र मंडळाच्या वतीने गेवराई शहरात मोफत आरोग्य तपासणी शिबीर व मोफत गोळ्या औषधी वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेकांनी यांचा लाभ घेतला.
औरंगाबाद येथील डॉ. सुधाकर गायकवाड यांनी १२६ रुग्णांची तपासणी करून रुग्णांवर औषधी उपचार केला. कार्यक्रमाचे उदघाटन जि. प. सदस्य जालिंदर पिसाळ यांनी केले. प्रमुख पाहुणे दत्ता पिसाळ, अक्षय पवार, माधव बेद्रे, विजय खंडागळे, परेश नेमाने हे उपस्थित होते.
अमन सुतार,नवनाथ धुरंधरे, रुद्राक्ष नारेवाड, बाळासाहेब पिसाळ, राहुल चव्हाण, बाळू नेमाने, बाबू पिसाळ, भैय्या सुतार, राहुल सुतार, दत्ता सुतार, दिगंबर सुतार, किरण सुतार, बली सुतार, महादेव सुतार, दीपक सुतार, सम्राट सुतार, लखन सुतार, नागेश नारेवाड, श्रीकांत सुतार, आदर्श नाडे, अनिकेत सुतार, रवी सुतार, संदीप सुतार आदी उपस्थित होते.