१,२९५ नवे रुग्ण तर १,२१७ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:36 AM2021-05-11T04:36:16+5:302021-05-11T04:36:16+5:30
रविवारी दिवसभरात ४ हजार २४१ जणांची तपासणी केली गेली. याचे अहवाल सोमवारी आले. यामध्ये २ हजार ९४६ जणांचे अहवाल ...
रविवारी दिवसभरात ४ हजार २४१ जणांची तपासणी केली गेली. याचे अहवाल सोमवारी आले. यामध्ये २ हजार ९४६ जणांचे अहवाल निगेटिव्ह तर १,२९५ नवे रुग्ण आढळून आले. बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात १६५, आष्टीत ७७, बीडमध्ये ३०४, धारुरमध्ये ११३, गेवराईमध्ये ११८, केजमध्ये २१५, माजलगावात ६४, परळीत ७३, पाटोद्यात ५५, शिरुरमध्ये ६३ तर वडवणीत २८ नवे रुग्ण आढळून आले. दिवसभरात १,२१७ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आता जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ६७ हजार ७२० इतकी झाली आहे तर बरे होणाऱ्यांचा आकडा ५९ हजार ९८७ इतका झाला आहे. जुन्या ३५ जणांसह सोमवारी १५ जणांच्या बळींची नोंद आरोग्य विभागाच्या पोर्टलवर झाली. आतापर्यंत १ हजार १६० जणांचा कोरोनाने जीव घेतला आहे.
आणखी ३० हिंडफिरे पॉझिटिव्ह
जिल्ह्यात कडक संचारबंदी सुरु असून विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांची ॲंटिजन चाचणी केली जात आहे. बीडमध्ये ९ तर अंबाजोगाईत पाच पथके यासाठी स्थापन केलेली आहेत. सोमवारी एकूण २५४ जणांची अँटिजन चाचणी करण्यात आली. यात ३० जण बाधित असल्याचे निष्पन्न झाले, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांनी दिली.