पुन्हा १३ मृत्यू; १२९७ नवे रूग्ण तर १०६६ काेरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:36 AM2021-04-28T04:36:51+5:302021-04-28T04:36:51+5:30
यात अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयातील ६३ वर्षिय महिला, अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा येथील ६५ वर्षिय महिला, आपेगावमधील७० वर्षिय पुरुष, शहरातील जयभवानीनगरमधील ...
यात अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयातील ६३ वर्षिय महिला, अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा येथील ६५ वर्षिय महिला, आपेगावमधील७० वर्षिय पुरुष, शहरातील जयभवानीनगरमधील ८४ वर्षिय पुरुष, बीड शहरातील आंबीका चौक भागातील ४८ वर्षिय महिला, धानोरा रोड भागातील ४० वर्षिय महिला, धारुर तालुक्यातील काटेवाडी येथील ७५ वर्षिय महिला, गेवराई तालुक्यातील गुळस येथील ७२ वर्षिय पुरुष, गेवराई शहरातील गणेशनगर भागातील २८ वर्षिय महिला, याच शहरातील ६५ वर्षिय पुरुष, पाटोदा तालुक्यातील पिंपळाचीवाडी येथील ६५ वर्षिय महिला, मंजेरी येथील ५० वर्षिय पुरुष आणि तांबा राजूरी येथील ७३ वर्षिय पुरुषाचा समावेश आहे. तसेच जिल्ह्यातील कोरोना संशयित असलेल्या ४ हजार ३९७ लाेकांची चाचणी करण्यात आली होती. याचे अहवाल मंगळवारी प्राप्त झाले. यात ३ हजार १०० लोकांचा अहवाल निगेटिव्ह आला तर १ हजार २९७ लोक पॉझिटिव्ह आढळले. यात अंबाजोगाई २०६, आष्टी १३८, बीड ३१३, धारुर ५२, गेवराई ८४, केज १७१, माजलगाव ४४, परळी ८५, पाटोदा ७७, शिरुर ८२, वडवणीतील ४५ रुग्णांचा समावेश आहे.
आता जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ४९ हजार ६७५ एवढी आहे. पैकी ४३ हजार ३८ कोरोनामुक्त झाले असून ८६५ जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाच्यावतीने सीईओ अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार, साथरोग अधिकारी डॉ.पी.के.पिंगळे यांनी ही माहिती दिली.