भेसळयुक्त दूध बनविण्यासाठीचे 20 हजार 310 किलो पावडर जप्त, बीड जिह्यात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2024 07:46 PM2024-08-04T19:46:34+5:302024-08-04T19:47:26+5:30

१० तास चालली कारवाई; बीडचे जिल्हाधिकारी,अन्न औषध प्रशासन, पोलीस होते तळ ठोकून

13 thousand kg powder for making adulterated milk seized in Beed | भेसळयुक्त दूध बनविण्यासाठीचे 20 हजार 310 किलो पावडर जप्त, बीड जिह्यात खळबळ

भेसळयुक्त दूध बनविण्यासाठीचे 20 हजार 310 किलो पावडर जप्त, बीड जिह्यात खळबळ

नितीन कांबळे

कडा- दुधाची गुणवत्ता वाढवण्यासाठी अनधिकृतपणे वापरण्यात येणाऱ्या पावडरचा साठा एका गोडाऊन मध्ये असल्याची गोपनीय माहिती प्रशासनाला मिळताच जिल्हाधिकाऱ्यांसह,अन्न औषध प्रशासन, पोलीस यांनी संयुक्त दहा तास कारवाई करत १८ लाख ७२ हजार रूपयांची २० हजार ३१० किलो पावडर असलेल्या ७०६ गोण्या जप्त केल्याची मोठी कारवाई कडा येथे रविवारी पहाटे करण्यात आली.विशेष म्हणजे ही कारवाई १० तास चालली होती.

आष्टी तालुक्यातील बीड नगर राष्ट्रीय महामार्गावरील कडा येथील टाकळी अमिया फाट्याजवळ एका भाडोत्री पत्र्याच्या शेडमध्ये दुधाची गुणवत्ता वाढवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पावडरचा मोठा साठा असल्याची गोपनीय माहिती जिल्हाधिकाऱ्याना मिळाली होती.जिल्हाधिकाऱ्यासह,अन्न औषध प्रशासन व  पोलिसांच्या पथकाने पहाटेच या ठिकाणी धाड टाकली. विक्रीसाठी साठा ठेवलेल्या अंबादास पांडुरंग चौधरी याला ताब्यात घेत त्याने साठा केलेल्या ठिकाणावरून १८ लाख ७२ हजार  रूपये किंमतीची २० हजार ३१० किलो पावडरच्या ७०६ गोण्या जप्त करत त्याच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल केला.

Web Title: 13 thousand kg powder for making adulterated milk seized in Beed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.