१३३ कोटींचा विकास आराखडा वैद्यनाथ ज्योतिर्लिंगासाठी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 12:22 AM2019-01-16T00:22:33+5:302019-01-16T00:24:52+5:30
वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र विकासाच्या १३३ कोटी ५८ लाख रुपयांच्या विकास आराखड्याला नगरविकास विभागाने मंजुरी दिली असून तसा आदेशही १५ जानेवारी रोजी निर्गिमत केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र विकासाच्या १३३ कोटी ५८ लाख रुपयांच्या विकास आराखड्याला नगरविकास विभागाने मंजुरी दिली असून तसा आदेशही १५ जानेवारी रोजी निर्गिमत केला आहे. ग्रामविकास, महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी ही माहिती दिली.
डीपीडीसीच्या बैठकीसाठी त्या बीड येथे आल्या होत्या. त्यांनी सांगितले की, जिल्हाधिकारी बीड यांनी वैद्यनाथ ज्योर्तिलिंग तीर्थक्षेत्र विकासाचा आराखडा काही दिवसांपूर्वी नगरविकास विभागाकडे सादर केला होता.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीच्या २० डिसेंबर रोजीच्या बैठकीत हा आराखडा मान्यही करण्यात आला होता.
या आराखड्यातंर्गत वैद्यनाथ मंदिर परिसर तसेच मेरू पर्वताचे सुशोभिकरण, पाणीपुरवठा, स्वच्छता, भाविकांसाठी विविध प्रकारच्या सुविधा आदी कामे करण्यात येणार आहेत.
या आराखड्यास १५ रोजी मंजुरी देण्यात आली. या विकास आराखड्यातंर्गत २५ कोटी रु पयांचा निधी देखील यापूर्वीच अर्थसंकल्पित करण्यात आला आहे.