‘मानवलोक’कडून स्वाराती रुग्णालयास १४ कुलिंग मशीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:33 AM2021-04-27T04:33:25+5:302021-04-27T04:33:25+5:30
अंबाजोगाई : येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना उन्हाच्या गरमीचा दिलासा मिळावा, यासाठी ...
अंबाजोगाई : येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना उन्हाच्या गरमीचा दिलासा मिळावा, यासाठी ‘मानवलोक’ने पुढाकार घेतला आहे. यासाठी १४ एसी मशीन ‘मानवलोक’ने सोमवारी भेट दिलेल्या आहेत.
अंबाजोगाई येथील स्वारातीच्या कोरोना सेंटरमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी आठ वॉर्ड निर्माण करण्यात आले आहेत. जवळपास ११० डॉक्टर या रुग्णांना आरोग्य सेवा देत आहेत. उन्हाची काहिली वाढत चालली आहे. यामुळे कोविड रुग्णांना गरमीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अगोदरच ऑक्सिजनची कमतरता आहे. डॉक्टरांनाही पीपीई कीट घालून अशा गरमीमध्ये काम करणे हे दिव्यच आहे. या सर्व अडचणी लक्षात घेऊन ‘मानवलोक’चे कार्यवाह अनिकेत लोहिया यांनी चार दिवसांपूर्वीच अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांना आपण एसी मशीन देणार हे जाहीर केले होते. दरम्यान, सोमवारी अनिकेत लोहिया यांनी १४ एसी कुलींग मशीन वैद्यकीय महाविद्यालयाकडे हस्तांतरीत केलेल्या आहेत. ‘मानवलोक’च्या या दातृत्त्वाबद्दल अनेकांनी त्यांचे स्वागत केले आहे.