१४ कर्मचा-यांना नोटीस, उत्तरपत्रिका जळित प्रकरणी जबाब घेतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 05:17 AM2018-03-05T05:17:50+5:302018-03-05T05:17:50+5:30
येथील गटसाधन केंद्रात बारावी व दहावीच्या तब्बल १,४२० उत्तरपत्रिका संशयास्पद पद्धतीने जळाल्यानंतर रविवारी शिक्षणाधिकारी बळीराम ढवळेंसह संबंधित शिक्षक आणि शिपाई अशा १४ कर्मचा-यांना कारणे दाखवा नोटीस बजावून लेखी जबाब घेण्यात आले आहेत.
केज (जि. बीड) - येथील गटसाधन केंद्रात बारावी व दहावीच्या तब्बल १,४२० उत्तरपत्रिका संशयास्पद पद्धतीने जळाल्यानंतर रविवारी शिक्षणाधिकारी बळीराम ढवळेंसह संबंधित शिक्षक आणि शिपाई अशा १४ कर्मचा-यांना कारणे दाखवा नोटीस बजावून लेखी
जबाब घेण्यात आले आहेत. याप्रकरणी घातपाताचा संशय व्यक्त होत असून गुन्हा दाखल झाला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. गटशिक्षणाधिकारी बळीराम ढवळे यांचा पदभार काढून सुनील केंद्रे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
शिक्षणाधिकाºयांनी चौकशी करून विभागीय सचिवांना अहवाल पाठविला आहे. राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आणि सचिव त्यावर निर्णय घेणार आहेत.
औरंगाबाद शिक्षण विभागाच्या सचिव सुजाता पुन्ने म्हणाल्या, चौकशीचे आदेश दिले आहेत.
तहसीलदारांनी बजावली नोटीस
तहसीलदार अविनाश कांबळे यांनीही गटशिक्षणाधिकारी तथा दहावी, बारावीचे परीरक्षक बळीराम दगडू ढवळे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
गोपनीय पद्धतीने गुणदान
पुणे : उत्तरपत्रिका जळालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, असे राज्य शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा शंकुतला काळे यांनी स्पष्ट केले आहे. मंडळाने निश्चित केलेल्या गोपनीय पद्धतीने विद्यार्थ्यांना गुण दिले जाणार असून विद्यार्थ्यांनी निश्चिंत होऊन पुढील पेपर द्यावेत ,असे आवाहनही काळे यांनी केले आहे.