वैभव कलुबर्मे, दिनेश आहेरसह १४ पोलीस कर्मचा-यांना ‘रिवॉर्ड’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 12:02 AM2018-01-26T00:02:27+5:302018-01-26T00:02:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : गतवर्षात गुन्ह्यातील सर्वाधिक मालमत्ता हस्तगत करण्यात गेवराई पोलिसांची कामगिरी सर्वाेत्कृष्ट आहे. त्यामुळे त्यांना पोलीस ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : गतवर्षात गुन्ह्यातील सर्वाधिक मालमत्ता हस्तगत करण्यात गेवराई पोलिसांची कामगिरी सर्वाेत्कृष्ट आहे. त्यामुळे त्यांना पोलीस महासंचालकांच्या हस्ते ‘रिवॉर्ड’ देऊन गौरविण्यात येणार आहे. यामध्ये अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांचाही समावेश आहे.
गतवर्षात गेवराई येथील स्टेट बँक आॅफ इंडियामध्ये दरोडा पडला होता. यामध्ये लाखो रूपयांची रोख रक्कम लंपास केली होती. त्यानंतर अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांनी तपासकार्य सुरू केले. आणि यामध्ये तब्बल १५ लाख रूपयांची रक्कम दरोडेखोरांकडून हस्तगत करण्यात आली होती.
या कामगिरीची पोलीस महासंचालकांनी दखल घेत या गुन्ह्यांचा तपास लावण्यासाठी परिश्रम घेणा-या अधिकारी, कर्मचाºयांना बक्षिस जाहिर करण्यात आले आहे. यामध्ये अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, सपोनि एस.डी.गुरमे, आर.एस. भाकरे, व्ही.के.जोगदंड, जी.जी. मिसाळ, पी.एस.जगताप, एम.आर. वाघ, ए.टी.महाजन, एन.बी. ठाकूर, व्ही.आर.चव्हाण, आर.एम. सांगळे, पी.ए.सुरवसे, जयदीप सोनवणे यांचा समावेश आहे. परिक्षेत्रीय स्तरावर हा कार्यक्रम घेऊन या सर्व अधिकाºयांना गौरविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी त्यांचे स्वागत केले.
दोघांची नावे वगळली ?
विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईत दरोडा प्रतिबंधक पथकाचे संजय खताळ व गणेश दुधाळ हे दोन कर्मचारी होते. परंतु या रिवॉर्डमध्ये या दोघांची नावे वगळण्यात आली आहेत. यामध्ये नेमकी चूक कोणाची? याबाबत चौकशी केली जाणार असल्याचे समजते.