दुसऱ्या दिवशीही १४ विद्यार्थी निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 11:59 PM2019-02-22T23:59:56+5:302019-02-23T00:00:26+5:30
महाराष्टÑ राज्य उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने गुरुवारपासून सुरु झालेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत दुस-या दिवशी हिंदी विषयाच्या परीक्षेत १४ विद्यार्थ्यांवर रस्टीकेटची कारवाई करण्यात आली. भरारी पथकांनी या कारवाया केल्या.
बीड : महाराष्टÑ राज्य उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने गुरुवारपासून सुरु झालेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत दुसºया दिवशी हिंदी विषयाच्या परीक्षेत १४ विद्यार्थ्यांवर रस्टीकेटची कारवाई करण्यात आली. भरारी पथकांनी या कारवाया केल्या.
गुरुवारी पहिल्या दिवशी इंग्रजी विषयाच्या परीक्षेत १४ जणांवर कारवाई करण्यात आली होती. दरम्यान शुक्रवारी शिक्षणाधिकारी (मा.) भगवानराव सोनवणे, उपशिक्षणाधिकारी मोहन काकडे यांच्या पथकाने माजलगाव तालुक्यातील वारोळा येथील आश्रमशाळा कनिष्ठ महाविद्यालयाच्या केंद्राला भेट दिली. परीक्षेदरम्यान कॉपी करताना आढळलेल्या २ विद्यार्थ्यांवर रस्टीकेटकची कारवाई करण्यात आली. तर माजलगावातील सुंदरराव सोळंके महाविद्यालय केंद्रावर एका विद्यार्थ्यावर कारवाई झाली.
केज येथे सरस्वती कन्या विद्यालय परीक्षा केंद्रावर डायटचे प्राचार्य विनोद देवगावकर यांच्या पथकाने ३ विद्यार्थ्यांवर कारवाई केली. तर शिरुर तालुक्यातील रायमोहा येथील परीक्षा केंद्रावर उपशिक्षणाधिकारी हिरालाल कराड यांच्या पथकाने एका विद्यार्थ्यावर कारवाई केली. शुक्रवारी हिंदी विषयाच्या परीक्षेसाठी १४ हजार ५९१ विद्यार्थी नोंदीत होते. त्यापैकी १४ हजार ११० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर ४८१ विद्यार्थी गैरहजर होते, अशी माहिती जिल्हा संनियंत्रण कक्षाचे दीपक खोड व ए. के. गुंड यांनी दिली.
वडवणीत ७ जणांवर कारवाई
वडवणी येथील महाराणी ताराबाई मा. उच्च माध्यमिक विद्यालय परीक्षा केंद्रावर शिक्षणाधिकारी (प्रा. ) राजेश गायकवाड यांच्या पथकाने पहणी केली. या वेळी कॉपी करताना आढळलेल्या ७ जणांवर रस्टीकेटची कारवाई करण्यात आली. एकाच केंद्रावर ७ जणांवर कारवाई झाल्याने ग्रामीण भागात कॉप्यांचा वापर होत असल्याचे उघड झाले आहे.