पंधरा दिवसांत परळी उपजिल्हा रुग्णालयात १२६ बधितांवर उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:35 AM2021-05-19T04:35:00+5:302021-05-19T04:35:00+5:30

उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिनेश कुरमे, कोविड सेंटरचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्शद शेख, डॉ. राजेश्री गिते, ...

In 15 days, 126 victims were treated at Parli Sub-District Hospital | पंधरा दिवसांत परळी उपजिल्हा रुग्णालयात १२६ बधितांवर उपचार

पंधरा दिवसांत परळी उपजिल्हा रुग्णालयात १२६ बधितांवर उपचार

Next

उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिनेश कुरमे, कोविड सेंटरचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्शद शेख, डॉ. राजेश्री गिते, डॉ. तिडके, डॉ. संजय गिते, डॉ. माने, डॉ. माले, डॉ. अस्मा शेख, डाॅ. दिलीप गायकवाड, डॉ. केंद्रे, डॉ. सानप, डॉ. नाथराव फड, डॉ. गणेश मुंडे, डॉ. गोविंद मुंडे, डॉ. प्रदीप गुट्टे, डाॅ. मठपती, इन्चार्ज आशीष ब्रदर्स, खडके सिस्टर सर्व नर्सिंग स्टाफ आदी आरोग्य कर्मचारी रात्रंदिवस प्रचंड मेहनत घेत आहेत. शहर व तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत होती. सरकारी किंवा खाजगी कोविडच्या दवाखान्यात रुग्णाला बेड मिळत नव्हता, ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा अशा महाभयंकर परिस्थितीत परळी उपजिल्हा रुग्णालयामध्ये ५० बेडचे कोविड सेंटर ३ मेपासून सुरू केले आहे.

Web Title: In 15 days, 126 victims were treated at Parli Sub-District Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.