खोटारडे गुरुजी निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 01:17 AM2018-09-26T01:17:54+5:302018-09-26T01:18:04+5:30
जिल्हा परिषदेतील १६ शिक्षकांना मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी निलंबित केले
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्हांतर्गत आॅनलाईन बदली प्रक्रियेत खोटी, चुकीची तसेच दिशाभूल करणारी माहिती सादर केल्याप्रकरणी अंतिम सुनावणी अखेर जिल्हा परिषदेतील १६ शिक्षकांना मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी निलंबित केले आहे. बदल्यांसाठी ठकबाजी करणाऱ्या गुरुजींना निलंबनाचा ‘रट्टा’ बसला. बीड जिल्हा परिषदेतील हा निर्णय धाडसी मानला जात असून, अशी कारवाई राज्यात प्रथमच झाली असावी.
जिल्हा परिषदेत शिक्षकांच्या मे, जूनमध्ये झालेल्या जिल्हाअंतर्गत बदल्यांमध्ये पात्र असताना शिक्षकांवर अन्याय झाल्याने चुकीची माहिती सादर करुन बदलीचा लाभ घेणाºया शिक्षकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी विविध शिक्षक संघटना व शिक्षकांनी केली होती. या संदर्भात राज्याच्या ग्रामविकास मंत्रालयाकडे तक्रारीनंतर आॅनलाईन अर्जात चुकीची माहिती भरणाºया शिक्षकांना पाठीशी न घालता कठोर कारवाईचे निर्देश दिले होते. चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती भरणाºया ४१५ शिक्षकांच्या संदर्भात जिल्हा परिषद प्रशासनाकडे तक्रारी आल्या होत्या. त्यांची सुनावणी विविध टप्प्यात झाली. गटशिक्षणाधिकाºयांकडून अहवाल मागविण्यात आले होते. यात १८ शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. संवर्ग-१ आणि २ मध्ये बहुतांश शिक्षकांनी चुकीची व दिशाभूल करणारी माहिती भरली, त्यामुळे अनेक शिक्षक विस्थापित झाल्याने त्यांनी तक्रारी केल्या होत्या. निलंबित केलेल्या १६ शिक्षकांची एक वेतनवाढ रोखली जाणार आहे. तसेच नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई होत आहे.
मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी ३२ सहशिक्षकांच्या सुनावण्या घेतल्या होत्या, त्यांचे खुलासे प्राप्त झाले होते तर अंतराबाबत तक्रार असल्याची पडताळणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंत्यांनी केली. इतर उर्वरित प्रकरणात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अंतराचा अहवाल अद्याप अप्राप्त असल्याने येत्या काही दिवसांत खोटी माहिती आढळणाºया संबंधित शिक्षकांवर देखील कारवाईची शक्यता आहे. यापुढे चुकीची माहिती दर्शवून लाभ घेतल्यास अशीच शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकारी राजेश गायकवाड यांनी सांगितले.
निलंबनाची ही कारणे
पती-पत्नी एकत्रिकरणात ३० किलोमीटरपेक्षा कमी अंतर असताना जास्त अंतर दाखवणारे ४ तसेच पती-पत्नीच्या आस्थापनेपासून ३० कि.मी. च्या आतील शाळा न मागता जास्त अंतराची शाळा मागणाºया २ शिक्षकांचा समावेश आहे. बीड जिल्हा परिषदेमध्ये सेवेत आलेला नियुक्ती दिनांक न दाखवता संस्था किंवा इतर जि.प.मधील दाखविणाºया ६ शिक्षकांचा समावेश आहे.
अंतरजिल्हा बदलीचा जुना आॅनलाईन अर्ज डिलीट न करता दुसºयांदा बदलीचा लाभ घेणारा तसेच पती सामाजिक संस्थेत कंत्राटी, पत्नी डाटा एन्ट्री आॅपरेटर असे दाखविण्यात आले होते. मात्र पती नमूद पदस्थापनेवर कार्यरत नसताना कार्यरत असल्याचे दाखविले, असे ४ शिक्षक आहेत. एका सहशिक्षिकेने दाखविलेले अंतर बरोबर होते, त्यांचा तसेच मेंदूविकार असणारा व परित्यक्ता महिला सहशिक्षिकेचा खुलासा मान्य करण्यात आला. तीन प्रकरणात अपंग पडताळणी आणि चार प्रकरणात शासनाचे मार्गदर्शन मागविण्यात आले आहेत.