१५ दिवसात १६५ रुग्ण पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:33 AM2021-04-17T04:33:08+5:302021-04-17T04:33:08+5:30
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १५ दिवसासाठी कडक निर्बंध घोषित केलेले असताना ही नागरिक बेजबाबदारपणे वागत आहेत. ...
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १५ दिवसासाठी कडक निर्बंध घोषित केलेले असताना ही नागरिक बेजबाबदारपणे वागत आहेत. शहरातील कस्तुरबा गांधी निवासी विद्यालयातील इमारत कोविड सेंटर उभारण्यात आली असून यामध्ये १ एप्रिलपासून १५ दिवसात १,०१६ तपासण्या करण्यात आल्या असून यापैकी १६५ पाॅझिटिव्ह रुग्ण नवीन आढळून आले. शहरात व ग्रामीण भागात कोरोनाचा कहर वाढला आहे. पहिल्या वेळेपेक्षा यावर्षी कोरोना घातक असल्याचे सांगितले जात आहे. मात्र शहरासह ग्रामीण भागात कोरोना संबंधित नियमावली सर्रास पायमल्ली होत असल्याने बाधिताची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे . प्रशासनाने जनजागृती करुन गावनिहाय समिती स्थापन करण्यात आली आहे तरी देखील नागरिक नियमाकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत.
शहरातील शिवाजी महाराज चौक, साठे चौक, नाईक चौक, आंबेडकर चौकात व आदी परिसरामध्ये किराणा, कृषी, भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली. यावेळी कुठल्याही दुकानांमध्ये खरेदी करताना नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळल्याचे दिसून आले नाही. प्रशासन वारंवार आवाहन करत आहे, मात्र नागरिक अजूनही कोरोनाला गांभीर्याने घेते नसल्याचे दिसत आहे.
नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, अत्यावश्यक कारण असेल तरच तोंडावर मास्क वापरावा व स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी. घरात राहून प्रशासनाला सहकार्य करावे.
डाॅ.एम. बी. घुबडे, तालुका आरोग्य अधिकारी
===Photopath===
160421\20210416_123611_14.jpg~160421\20210416_114357_14.jpg