परळी तालुक्यातील ७ ग्रामपंचायतींच्या ५७ जागांसाठी १६८ उमेदवारांचे अर्ज दाखल रेवली,वंजारवाडी बिनविरोध निघण्याची शक्यता, मोहा, भोपळा, लाडझारीत होणार चुरस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:32 AM2020-12-31T04:32:32+5:302020-12-31T04:32:32+5:30
रेवली गावच्या ९ जागांपैकी आठ जागा बिनविरोध निघाल्यात जमा आहेत. तसेच वंजारवाडी ग्रामपंचायतीच्या सात जागांसाठी केवळ ८ अर्ज ...
रेवली गावच्या ९ जागांपैकी आठ जागा बिनविरोध निघाल्यात जमा आहेत. तसेच वंजारवाडी ग्रामपंचायतीच्या सात जागांसाठी केवळ ८ अर्ज आले असल्याने येथेही बिनविरोध निवड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मोहा येथे ग्रामपंचायतीच्या ११ जागांसाठी चुरस निर्माण होणार असून ५४ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. माजी खासदार गंगाधरआप्पा बुरांडे यांचे मोहा हे गाव म्हणून ओळखले जाते. याठिकाणी माकपचे आतापर्यंत वर्चस्व राहिले आहे. तसेच भाजपाचे माजी आमदार आर. टी. देशमुख हेही मोहा गावचे आहेत. त्यामुळे येथील निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. लाडझरीची निवडणूकही अटीतटीची होण्याची शक्यता आहे. परळी तालुक्यातील रेवली येथील ग्रामपंचायतीच्या नऊ जागांपैकी आठ जागा बिनविरोध निघाल्या असून गावातील दोन्ही पॅनलच्या कार्यकर्त्यांनी परळी तहसील कार्यालयाच्या आवारात जल्लोष केला आहे.
गुलालाची उधळण करीत पेढे वाटून आनंदोत्सव केला साजरा
लाडझरी ९ जागांसाठी २६ अर्ज, भोपला ७ जागा २७ अर्ज, रेवली ९ जागा १० अर्ज, मोहा ११ जागा ५४ अर्ज, गडदेवाडी ७ जागा २८ अर्ज, वंजारवाडी -७ जागा ८ अर्ज, सरफराजपूर ७ जागा १४ अर्ज दाखल झाले आहेत.
परळी तालुक्यातील रेवली येथील ग्रामपंचायतीच्या नऊ जागांपैकी आठ जागा बिनविरोध निघाल्या असून गावातील दोन्ही पॅनेलच्या कार्यकर्त्यांनी परळी तहसील कार्यालयाच्या आवारात जल्लोष केला.