ऑनलाईन शिक्षणासाठी 'टॅब' हवा; मागणी पूर्ण न झाल्याने १७ वर्षीय मुलाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 05:01 PM2020-06-19T17:01:04+5:302020-06-19T17:06:36+5:30

पुढील शिक्षणासाठी टॅब मोबाईल घेऊन देण्याची पालकांकडे केली होती मागणी

17-year-old boy commits suicide due to 'mobile tab' demand's not fulfilled for online education | ऑनलाईन शिक्षणासाठी 'टॅब' हवा; मागणी पूर्ण न झाल्याने १७ वर्षीय मुलाची आत्महत्या

ऑनलाईन शिक्षणासाठी 'टॅब' हवा; मागणी पूर्ण न झाल्याने १७ वर्षीय मुलाची आत्महत्या

Next
ठळक मुद्देघरातील सर्वजण शेतात गेल्यास केली आत्महत्या

गेवराई : पुढील शिक्षणासाठी आई- वडिलांकडे टॅब मोबाईलची केलेली मागणी पूर्ण न झाल्याने एका १७ वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी ( दि. १८ ) तालुक्यातील  भोजगाव येथे घडली. अभिषेक राजेंद्र संत असे मृत मुलाचे नाव असून त्याने १० ची परीक्षा दिली होती. 

कोरोनामुळे आता ऑनलाईन शिक्षण पद्धतीवर भर आहे. यामुळे पुढील शिक्षणासाठी आपल्याकडे टॅब मोबाईल हवा अशी मागणी अभिषेकने आई-वडिलांकडे केली होती. पालकांनी पेरणीची लगबग सुरु असल्याने नंतर घेऊ असे आश्वासन दिले. मात्र गुरुवारी दुपारी सर्वजण शेतामध्ये गेल्यानंतर त्याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. 

घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पुरूषोत्तम चोबे, पोलिस उपनिरीक्षक युवराज टाकसाळ आदी कर्मचाऱ्यांनी  घटनास्थळी भेट दिली. त्याच्या पश्चात आई,वडिल,एक भाऊ, आजी, आजोबा असा परिवार आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: 17-year-old boy commits suicide due to 'mobile tab' demand's not fulfilled for online education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.