बीड जिल्हा वकील संघाच्या निवडणुकीत ७ जागांसाठी २४ उमेदवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 11:53 PM2019-08-02T23:53:56+5:302019-08-02T23:54:32+5:30
जिल्हा वकील संघाच्या सात जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत २४ इच्छुकांनी ३१ अर्जांद्वारे उमेदवारी दाखल केली. तर तीन जणांचे अर्ज बाद झाले.
बीड : जिल्हा वकील संघाच्या सात जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत २४ इच्छुकांनी ३१ अर्जांद्वारे उमेदवारी दाखल केली. तर तीन जणांचे अर्ज बाद झाले.
येत्या ६ आॅगस्ट रोजी जिल्हा वकील संघाची निवडणूक होत आहे. ८०३ सदस्य मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीत अध्यक्ष पदासाठी अॅड. दिनेश गोवर्धन हंगे व अॅड. राजेश आर्सूळ यांनी प्रत्येकी दोन अर्ज दाखल केले आहेत. उपाध्यक्ष पदासाठी अॅड. रामेश्वर चाळक, अॅड. सुरेश कुलकर्णी, अॅड. मोहताबसिब ताहेरुद्दीन नसिमोद्दीन (नुर), अॅड. शेख इमरान आय्युब पटेल, अॅड. सईद खुर्शीद देशमुख, सचिव पदासाठी अॅड. अभिषेक जोशी यांचे दोन अर्ज तर अॅड. रामेश्वर चाळक, अॅड. भाऊसाहेब लटपटे, अॅड. श्रीकांत जाधव, अॅड. रंजीत करांडे, अॅड. शेख इमरान अय्युब पटेल, अॅड. किशोर कसबे यांनी उमेदवारी दाखल केली. सहसचिव पदासाठी अॅड. सय्यद यासेर सय्यद नबी पटेल यांचे दोन तर अॅड. किशोर कसबे यांचा अर्ज दाखल झाला आहे. कोषाध्यक्षपदासाठी रणजित वाघमारे यांचेच दोन अर्ज दाखल आहेत. ग्रंथपाल सचिव पदासाठी अॅड. कृष्णा नवले यांचे दोन अर्ज अॅड. मनोज अंकुशे, अॅड. शेख इमरान खाजा, अॅड. धनराज शशिकांत जाधव, अॅड. विलास फाटक यांची उमेदवारी दाखल झाली आहे. महिला प्रतिनिधी म्हणून अॅड. बबिता पळसेकर आणि अॅड. संगीता भुतावळे यांचे प्रत्येकी दोन अर्ज दाखल करण्यात आले आहेत. ३ आॅगस्ट रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यानंतर उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अॅड. बालाप्रसाद करवा यांनी सांगितले.