माजलगावात चोरट्यांचा धुमाकूळ; २ घरे फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 01:04 AM2019-04-29T01:04:54+5:302019-04-29T01:05:53+5:30

खंडोबा मैदान परिसरातील कॉलनीमध्ये रविवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी धुमाकुळ घालुन दोन घरे फोडली

2 housebreakings in Majalgaon; | माजलगावात चोरट्यांचा धुमाकूळ; २ घरे फोडली

माजलगावात चोरट्यांचा धुमाकूळ; २ घरे फोडली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : शहरातील खंडोबा मैदान परिसरातील कॉलनीमध्ये रविवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी धुमाकुळ घालुन दोन घरे फोडली मात्र काही हाती लागत नसल्याचे लक्षात येताच त्यांनी सेवानिवृत्त अभियंता सुरेश कुलकर्णी मोगरेकर यांना जबर मारहाण व जखमी करून पळ काढल्याची घटना घडली तर दुस-या ठिकाणी निवृत्ती डाके हे यात्रेसाठी बाहेरगावी गेल्याने त्यांच्या घरातील किती ऐवज चोरीला गेला याची माहिती मिळू शकली नाही.
रविवारी पहाटे एक ते सव्वा दोनच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी नदीपात्रातून पॉवर हाउसच्या बाजुच्या गल्लीतूनन कॉलनीत प्रवेश केला. जगदीश बादाडे, पोरे सर यांचे घरास बाहेरून कड्या लावीत हे चोरटे कोणते घर रिकामे मिळते याचा शोध घेत फिरत होते. पुढे त्यांनी माजी नगरसेवक इनायत खान यांच्या घरासमोरील इतर घरांना बाहेरून कड्या लावल्या. त्यानंतर निवृत्ती डाके यांच्या घराला कुलूप असल्याचे पाहून तेथील चॅनल गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. बेडरूममधील व दुसऱ्या खोलीतील कपाट व उघडून त्यातील कपडे व सोने, चांदीच्या दागिन्यांचे बॉक्स उचकटून टाकले. डाके हे तीर्थयात्रेसाठी दोन दिवसांपूर्वीच सहकुटुंब गेल्याने त्यांच्या घरातून किती ऐवज चोरीला गेला हे समजू शकले नाही.
त्यानंतर चोरट्यांनी बाजुच्या कंपाउंडमधुन उड्या टाकुन सुरेश कुलकर्णी यांच्या घराकडे मोर्चा वळविला. चॅनल गेट व इतर तीन दारवाजांचे कुलूप तोडून त्यांच्या एका खोलीतील कपाट उचकटले. काहीच हाती न लागल्याने बेडरूमचा दरवाजा तोडला. तिथे सुरेश कुलकर्णी यांनी प्रतिकार करताच त्यांना जबर मारहाण करण्यात आली. त्यामध्ये कुलकर्णी यांच्या डोक्यास व हातास मार लागून मोठा रक्तस्त्राव झाला. कुलकर्णी कुटुंबीयांना आरडा - ओरड केल्याने चोरटे पळून गेले. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी व पोलिसांनी धाव घेतली.
पोलीस निरीक्षक सुलेमान हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. तसेच ठसेतज्ज्ञ,श्वान पथक,दरोडा प्रतिबंधक पथकाने भेटी दिल्या. श्वानाने बेकरीपर्यंत माग काढला. तेथून चोरटे नदीपात्रात उतरून पळून गेले असा अंदाज आहे.तर दुपारी उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत डीसले यांनीही भेट दिली.

Web Title: 2 housebreakings in Majalgaon;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.