भेसळीच्या संशयातून २ हजार ७९४ लिटर दुध नष्ट, दोन संकलन केंद्रावर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 07:34 PM2023-09-12T19:34:42+5:302023-09-12T19:35:48+5:30

आष्टी तालुक्यातील ब्रम्हगांव, हाजीपूर येथील दुध संकलन केंद्रावर धाड

2 thousand 794 liters of milk were destroyed due to suspicion of adulteration | भेसळीच्या संशयातून २ हजार ७९४ लिटर दुध नष्ट, दोन संकलन केंद्रावर कारवाई

भेसळीच्या संशयातून २ हजार ७९४ लिटर दुध नष्ट, दोन संकलन केंद्रावर कारवाई

googlenewsNext

- नितीन कांबळे
कडा:
आष्टी तालुक्यातील हाजीपूर व ब्रम्हगांव येथील केंद्रावर भेसळयुक्त दूध असल्याच्या संशयातून जिल्हा दुग्ध व्यवसाय विभागाच्या पथकाने सोमवारी सकाळी धाड टाकली. या कारवाईत पथकाने २ हजार ७९४ लिटर दूध जप्त करून नष्ट केले. ही कारवाई तब्बल ९ तास चालली.

हाजीपूर येथील कानिफनाथ दूध संकलन केंद्रात २५८ लिटर, ब्रम्हगांव येथील संत वामनभाऊ दूध संकलन केंद्रात १७९८ लिटर तर जय हनुमान दूध संकलन केंद्रातील ७३८ लिटर दूध असे एकूण २ हजार ७९४ लिटर दूध भेसळयुक्त असल्याच्या संशयातून नष्ट करण्यात आले. दोन्ही केंद्रावरील दुधाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा दुग्ध व्यवसाय अधिकारी एस.एम.केदार यांनी दिली.

ही कारवाई जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी एस.एम.केदार, दूध संकलन पर्यवेक्षक झेड.के.सोनवणे,  दुग्ध शाळा रसायन तज्ञ टी.एस भोसले, अन्न सुरक्षा अधिकारी एस.बी.गायकवाड, जोगदड पोलीस कर्मचारी, वनवे, वैघ मापन शास्त्र आदी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली.

नागरिकांनी तक्रार करावी
दूध व दूग्धजन्य पदार्था पॅकेट्सवर अथवा डब्यांवर तारीख स्पष्ट नमूद असणे आवश्यक आहे. मुदतबाह्यपदार्थ विक्रीसाठी ठेवू नये. भेसळ आढळल्यास नागरिकांनी तक्रार करावी, असे आवाहन समिती सदस्यांनी केले आहे.

Web Title: 2 thousand 794 liters of milk were destroyed due to suspicion of adulteration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.