मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत २० कोटींचा निधी- संगीता ठोंबरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 12:09 AM2018-11-06T00:09:47+5:302018-11-06T00:11:02+5:30
मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत केज मतदारसंघातील ग्रामीण भागातील ३५ किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आ. प्रा. संगीता ठोंबरे यांनी दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
केज : मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत केज मतदारसंघातील ग्रामीण भागातील ३५ किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आ. प्रा. संगीता ठोंबरे यांनी दिली आहे.
केज मतदारसंघातील केज व अंबाजोगाई तालुक्यातील ग्रामीण भागातील ४० किलोमीटर अंतराच्या रस्त्यासाठी २२ कोटी सत्तावीस लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. अंबाजोगाई तालुक्यात श्रीपतरायवाडी ते राज्य मार्ग या ३.३० किलोमीटर अंतरासाठी १८५.२४ लक्ष, मगरवाडी ते राज्य मार्ग या १.२० किलोमीटर अंतरासाठीच्या रस्त्याच्या कामासाठी ६७.६० लक्ष रुपये, तर प्रमुख जिल्हा मार्ग ते कोदरी ते गोंगारेवस्ती या १.५० किमीच्या कामासाठी ८६.६५ लक्ष रुपये, केज तालुक्यातील प्रमुख जिल्हा मार्ग ते घाटेवाडी या ५.१६ किलोमीटर अंतरासाठी २९०.५ लक्ष रुपये तर राज्य मार्ग ते डोणगाव जाधव जवळा शिरपूरा या ५.८० किमीच्या रस्त्याच्या कामासाठी ३८२.७० लक्ष रुपये तर मांगवडगाव ते सातेफळ ते राज्य मार्ग या ७.९२ किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी ४००.७० लक्ष रुपयांचा तर राज्य मार्ग ते चिंचोली माळी जवळ वरपगाव - खंदारेवस्ती या ९.५० किलोमीटर अंतरासाठी ५५९.१० लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आ. ठोंबरे यांनी दिली आहे.