सोळाशे घरकुल पूर्ण करण्यासाठी २० संपर्क अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:22 AM2021-01-01T04:22:42+5:302021-01-01T04:22:42+5:30

आष्टी: महाआवास अभियानांतर्गत घरकुल पूर्ण करण्यासाठी आष्टी तालुक्यात विस्तार अधिकारी, कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभियंता असे एकूण २० संपर्क ...

20 liaison officers to complete 16 hundred households | सोळाशे घरकुल पूर्ण करण्यासाठी २० संपर्क अधिकारी

सोळाशे घरकुल पूर्ण करण्यासाठी २० संपर्क अधिकारी

Next

आष्टी: महाआवास अभियानांतर्गत घरकुल पूर्ण करण्यासाठी आष्टी तालुक्यात विस्तार अधिकारी, कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभियंता असे एकूण २० संपर्क अधिकारी नियुक्त केले आहेत. त्यांना प्रत्येकी ४ गावांसाठी नेमून या गावांमध्ये राष्ट्रीय आवास दिनाचे औचित्य साधून राज्यात शंभर दिवसाचे महाआवास अभियान अंतर्गत २८ फेबुवारी २०२१ पर्यंत घरकुले पूर्ण करून घेण्याच्या सक्त सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रकल्प संचालकांनी दिल्या आहेत. आष्टी तालुक्यात १ हजार ६८१ घरकुल मंजूर आहेत. ही घरकुले पूर्ण करून घेण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रकल्प संचालकांनी नियुक्त केलेल्या संपर्क अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकांशी संपर्क साधून प्रत्यक्ष लाभार्थ्यांची भेट घेऊन त्या लाभार्थ्यांना घरकुल बांधकाम पूर्ण करण्याचे मार्गदर्शन करावे. तसेच पंचायत समिती स्तरावरून घर निर्माण अभियंता व ग्रामसेवक, रोजगार सेवक, सरपंचांना लेखी सक्त सूचना दिलेल्या आहेत. घरकुल अपूर्ण राहिल्यास ग्रामसेवक व लाभार्थी यांना जबाबदार धरण्यात येईल असे आवाहन गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे, सभापती माधुरी जगताप, उपसभापती रमेश तादळे यांनी केले आहे.

Web Title: 20 liaison officers to complete 16 hundred households

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.