माजलगावात काळ्या बाजारात जाणारा रेशनचा 200 पोते गव्हू व तांदूळ पकडला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 06:03 PM2018-02-14T18:03:08+5:302018-02-14T18:03:08+5:30

काळ्या बाजारात जाणारा रेशनचा 200 पोते तांदूळ व गव्हाने भरलेला ट्रक आज दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी भाग्यश्री नवटके यांनी कारवाई करत पकडला.

200 sacks of rice and wheat were caught in black market in Majalgaon | माजलगावात काळ्या बाजारात जाणारा रेशनचा 200 पोते गव्हू व तांदूळ पकडला 

माजलगावात काळ्या बाजारात जाणारा रेशनचा 200 पोते गव्हू व तांदूळ पकडला 

googlenewsNext

माजलगाव (बीड ) : काळ्या बाजारात जाणारा रेशनचा 200 पोते तांदूळ व गव्हाने भरलेला ट्रक आज दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी भाग्यश्री नवटके यांनी कारवाई करत पकडला. ही कारवाई पवारवाडी फाट्यावर झाली असून या प्रकरणी  ग्रामीण पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

या बाबत अधिक माहिती अशी कि, पाथरी येथून माजलगावकडे येणा-या ट्रक ( एम एच 26 ए डी 0174) मध्ये रेशन चा काळ्या बाजारात जाणारा माल असल्याची खबर उपविभागीय पोलीस अधिकारी भाग्यश्री नवटके यांना खब-यामार्फत मिळाली. या माहितीवरून त्यांनी हा ट्रक पवारवाडी फाट्यावर अडवला. चालकाकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. यानंतर त्यांनी हा ट्रक ताब्यात घेत ग्रामीण पोलीस स्टेशनला आणला. यात 200 पोते गहू व तांदळाची पोती आढळून आली. याबाबत ग्रामीण पोलीस अधिक चौकशी करत असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

Web Title: 200 sacks of rice and wheat were caught in black market in Majalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.