शिरूर तालुक्यात २१ शाळा हाेणार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:24 AM2021-07-16T04:24:13+5:302021-07-16T04:24:13+5:30

कोरोना चाचणी करून शिक्षक झाले सज्ज शिरूर कासार : प्रदीर्घ काळापासून कोरोना महामारीच्या भीतीपोटी शाळा बंद, तर शिक्षक आणि ...

21 schools to be started in Shirur taluka | शिरूर तालुक्यात २१ शाळा हाेणार सुरू

शिरूर तालुक्यात २१ शाळा हाेणार सुरू

Next

कोरोना चाचणी करून शिक्षक झाले सज्ज

शिरूर कासार : प्रदीर्घ काळापासून कोरोना महामारीच्या भीतीपोटी शाळा बंद, तर शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाने आंतरपाट धरला होता. आता तालुक्यात बाधित संख्येत घट होत असल्याने शासनाने शाळा सुरू करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार तालुक्यात ८ वी ते १२ वी पर्यंतच्या २१ शाळा सुरू होणार असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी शेख जमीर यांनी दिली.

तालुक्यात जिल्हा परिषदेसह संस्थेच्या ८ वी ते १२ वी पर्यंतच्या ५३ शाळा आहेत. मात्र, शासनाच्या मार्गदर्शक सूचेनुसार गुरुवारपाून २१ शाळा सुरू होत आहेत. यासाठी निर्देशित केल्याप्रमाणे पालकांची संमती तसे शिक्षकांचे लसीकरण व कोरोना तपासणीदेखील केली आहे. कोरोना तपासणी शंभर टक्के झाली असून ९८ टक्के शिक्षकांचे लसीकरण झाले आहे. कोरोनाच्या सर्व नियमावलींचे पालन करूनच विद्यार्जनाचे काम केले जाणार असून, विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत पुरेपूर काळजी शिक्षण विभाग घेणार असल्याचे सांगण्यात आले.

आतापर्यंत ऑनलाइन पद्धतीने शिक्षण दिले जात होते; परंतु त्यात अनंत अडचणी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना येत होत्या. या सर्वांवर मात करीत शिक्षण सुरूच होते. आता शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील हा कोरोनाचा आंतरपट बाजूला होऊन थेट ज्ञानमंदिरात विद्यार्जनाचे काम आजपासून सुरू होणार असल्याने शाळेचा दरबार गजबजणार आहे.

तालुक्यात बारा केंद्रांतर्गत सुमारे ५३ शाळांतील पटसंख्या आठवी १८४९, नववी २०५७, दहावी २३७२, अकरावी २०१५, तर बारावीञे २५८४ विद्यार्थी आहेत. मात्र, यातून २१ शाळांतील विद्यार्थीच आजपासून शाळेत येणार आहेत. उर्वरित शाळा व त्यातील विद्यार्थ्यांना वेळेची प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे गटशिक्षणाधिकारी जमीर शेख यांनी सांगितले.

या गावांत सुरू होणार शाळा

शिरूर शहर ३, रायमोहा ४, पिंपळनेर, सिंदफना, जांब, खांबा, लिंबा, मानूर, दहीफळे वस्ती, राक्षसभुवन, कान्होबाची वाडी, आनंदगाव, पाडळी, सांगळवाडी, निगमानंद विद्यालय व सुभद्राबाई विद्यालय या २१ शाळा आजपासून सुरू होत असल्याचे सांगण्यात आले.

140721\2433img-20210127-wa0050.jpg

फोटो

Web Title: 21 schools to be started in Shirur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.