जिल्हा बँकेच्या १९ जागांसाठी २१४ जणांचे अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:51 AM2021-02-23T04:51:41+5:302021-02-23T04:51:41+5:30
बीड : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १९ संचालकांच्या जागांसाठी २२ फेब्रुवारी रोजी २१४ उमेदवारी अर्ज दाखल झाले. सेवा सोसायटीच्या ...
बीड : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १९ संचालकांच्या जागांसाठी २२ फेब्रुवारी रोजी २१४ उमेदवारी अर्ज दाखल झाले. सेवा सोसायटीच्या १३ जागांवर ८७ उमेदवार इच्छुक आहेत.
जिल्हा बँकेची निवडणूक १३ फेब्रुवारी रोजी जाहीर झाली होती. या निवडणुकीत १५ फेब्रुवारीपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. पहिल्या चार दिवसांपर्यंत २९९ अर्ज विकले होते.;तर ३२ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. सलग तीन दिवस सुटी आल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी २२ फेब्रुवारी हा शेवटचा एकच दिवस होता. सोमवारी सकाळपासूनच जिल्हा उपनिबंधक कार्यालयात अर्ज घेणारे व भरणाऱ्यांची गर्दी झाली होती. कोरोनाचे सावट असतानाही सोशल डिस्टन्स न पाळता उमेदवारी दाखल करण्यासाठी मोठी गर्दी दिसून आली. एकूण २१४ उमेदवारी अर्ज दाखल झाले.
सेवा सोसायटी मतदारसंघातून वसंत सानप, विजयसिंह पंडित, फुलचंद मुंडे, जयदत्त धस, महेंद्र गर्जे, अशोक लोढा, राेहिदास झांबरे, चंद्रकला वनवे, सतीश शिंदे, सत्यभामा बांगर, रमेश आडसकर, दाजीसाहेब लोमटे, अभय मुंडे, ऋषिकेश आडसकर, बजरंग सोनवणे, अभय मुंडे, राजेंद्र मस्के आदींनी उमेदवारी दाखल केली आहे.
नागरी बँक, पतसंस्थेतून विद्यमान अध्यक्ष आदित्य सारडा, चंद्रकांत सानप, संजय आधळे, संगीता लोढा आदींसह १९ जणांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले.
सेवा सोसायटी मतदारसंघात चुरस
सेवा सोसायटी मतदारसंघात १३ तालुक्यातून प्रत्येकी एक जागा आहे. मात्र या मतदार संघातून तब्बल ८७ अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे निवडून येण्यासाठी उमेदवारांना मोठी कसरत करावी लागणार आहे.
----------
मतदार संघनिहाय उमेदवारी अर्ज
सेवा सोसायटी मतदार संघ -- ८७
महिला मतदार संघ--- १९
अनु. जाती. ज. मतदार संघ -- १९
इतर संस्था वै. मतदार संघ-- २२
इतर मा. मतदार संघ --१२
कृषी पणन प्रक्रिया मतदार संघ- ९
नागरी बँक, पतसंस्था -- १९
विजाभज, विमाप्र -- २७
--------
छाननी जिल्हा बँकेच्या सभागृहात
२३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या मान्यतेने छाननीचे स्थळ बदलण्यात आले आहे. नामनिर्देशन पत्रांची छाननी जिल्हा सहकारी बँकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात होणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी विश्वास देशमुख यांनी कळविले आहे.
--------
===Photopath===
220221\222_bed_20_22022021_14.jpg
===Caption===
बीड जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्हा उपनिबंदक कार्यालयात अशी गर्दी झाली होती.