माजलगाव तालुक्यातील २२ आरोग्य उपकेंद्र वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:26 AM2021-07-17T04:26:31+5:302021-07-17T04:26:31+5:30

पुरूषोत्तम करवा माजलगाव : तालुक्यातील सर्वच २२ आरोग्य उपकेंद्र वाऱ्यावर दिसून येत आहेत. एकाही उपकेंद्रात कर्मचारी उपस्थित राहत ...

22 health sub-centers in Majalgaon taluka on wind | माजलगाव तालुक्यातील २२ आरोग्य उपकेंद्र वाऱ्यावर

माजलगाव तालुक्यातील २२ आरोग्य उपकेंद्र वाऱ्यावर

Next

पुरूषोत्तम करवा

माजलगाव : तालुक्यातील सर्वच २२ आरोग्य उपकेंद्र वाऱ्यावर दिसून येत आहेत. एकाही उपकेंद्रात कर्मचारी उपस्थित राहत नसल्याने नागरिकांना उपचारासाठी खासगी दवाखान्यात जाऊन उपचार घेण्याची वेळ आली आहे. माजलगाव तालुक्यात उमरी,लोणगाव, पात्रुड, नित्रुड,दिंद्रुड,वांगी, गंगामसला,खरात आडगाव, मोगरा,आबेगाव, माजलगाव ग्रामीण, मंजरथ,सावरगाव, किट्टी आडगाव, पुरूषोत्तमपुरी,वाघोरा,मंगरुळ,हा.निमगाव, टाकरवण, राजेगाव,एकदरा अशी बावीस आरोग्य उपकेंद्र आहेत. यातील काही उपकेंद्रात कर्मचारी उपस्थित राहतात तर काही उपकेंद्र शोभेची वस्तू बनल्या आहेत.सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. याठिकाणी कर्मचारी उपस्थित राहत नसल्याने ग्रामीण भागातील आजारी रूग्णांना प्राथमिक उपचार मिळत नसल्याने खासगी दवाखान्यात जाऊन उपचार घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. एका उपकेंद्रात दोन ते तीन कर्मचारी आहेत. मात्र ते कर्मचारी उपकेंद्रात कधीच उपस्थित राहत नाहीत. उपकेंद्राच्या ठिकाणी रहाणे सक्तीचे असताना कर्मचारी राहत नसल्याने ग्रामीण रुग्णांना रात्री अपरात्री तालुक्याचा ठिकाणी जाऊन उपचार घ्यावा लागत आहे. उपकेंद्रात गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी ग्रामीण भागातील नागरिकांनी केली आहे.

--------

तालुक्यात २२ आरोग्य उपकेंद्र असून काही ठिकाणी आमचे कर्मचारी वेळोवेळी उपस्थित राहतात. ज्या ठिकाणचे कर्मचारी वास्तव्यास राहत नाहीत, त्यांच्यावर कारवाई केली जाईल. - डॉ. मधुकर घुबडे,

तालुका वैद्यकीय अधिकारी

--------

तीन वर्षांपासून कर्मचाऱ्यांनी ग्रामपंचायतकडून कसल्याही प्रकारचे वास्तव्य प्रमाणपत्र न घेता त्यांच्या पगार कसा करण्यात आल्या हे गौडबंगाल आहे. याबद्दल आपण जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार आहोत. --

धनंजय कोळसे, सरपंच, लोणगाव.

160721\purusttam karva_img-20210716-wa0021_14.jpg

Web Title: 22 health sub-centers in Majalgaon taluka on wind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.