२२ भूखंड बोगस प्रक्रिया राबवून लाटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:32 AM2021-04-25T04:32:58+5:302021-04-25T04:32:58+5:30
धारूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील २२ भूखंड कोरोनाकाळामध्ये बोगस वाटप प्रक्रिया राबवून पदाधिकारी व संचालक मंडळाने ...
धारूर
: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील २२ भूखंड कोरोनाकाळामध्ये बोगस वाटप प्रक्रिया राबवून पदाधिकारी व संचालक मंडळाने नातेवाइकांच्या नावे वाटून घेतल्याने ही प्रक्रिया तत्काळ रद्द करण्यात यावी. नसता आंदोलनाचा इशारा संचालक चिंतामण सोळुंके यांनी पणन संचालकांकडे निवेदनाद्वारे दिला आहे.
धारूर मार्केट यार्डातील रिकामे २२ भूखंडवाटपाच्या ठरावाबाबत संचालक मंडळाच्या सभेत भूखंडवाटप करणे योग्य नसल्याने तसेच वाटप करायचे असल्यास जुन्या प्रलंबित मागणी अर्जाप्रमाणे व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन आॕॅनलाइन पद्धतीने योग्य प्रसिद्धी देऊन पारदर्शक पद्धतीने जास्तीतजास्त बोलीप्रमाणे लिलाव होऊन प्लाॕॅटवाटप करावे, असे मत राष्ट्रवादीच्या सहा संचालकांनी नोंदवले होते. मात्र, या सहा संचालकांचे म्हणणे विचारात न घेता अनावश्यक लोकांना नाममात्र फीची पावती घेऊन प्लाॕॅट देण्यात आले आहेत. त्या ठरावासदेखील विरोध केला होता. तशी नोंदवहीत सभा रजिस्टरला नोंद आहे. तरीही, बोगस कागदपत्रे तयार करून प्रस्ताव सादर केल्याने ते मंजूर करू नयेत, असा अर्ज सहा संचालकांनी केला होता. अर्ज मंजूर केल्यास उपोषणाचा इशारा दिला होता. असे असताना ९ जुलै रोजी या बोगस प्रस्तावाला मंजुरी दिलेली आहे. ही मंजुरी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी अर्थपूर्ण संबंध ठेवून घेतल्याचा व मोठा गैरप्रकार केल्याचा आरोप संचालकांनी दिलेल्या निवेदनात केला आहे.
तीन कोटींचे भूखंड
या २२ भूखंडांची किंमत ३ कोटी रुपये आहे. हे भूखंड गरजू नागरिक, व्यापाऱ्यांना न देता सत्ताधारी संचालकांच्या नातेवाइकांच्या नावावर नाममात्र किमतीची पावती फाडून वाटप केले आहेत. नंतर, हे प्लाॕॅट १५-२० लाखांत विकण्याचा सत्ताधाऱ्यांचा घाट आहे. या भूखंड वाटपाचा आदेश रद्द न झाल्यास आंदोलन करणार आहोत. - चिंतामण संजय सोळंके, संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, धारूर
नियमानुसार कार्यवाही, कुठलाही गैरप्रकार नाही
बाजार समिती क्षेत्रातील २२ प्लाॕॅट हे रिकामे होते. सर्व नियमांचे पालन करून या प्लाॕॅटचे वाटप नियमानुसार करण्यात आले आहे. कुठलाही गैरप्रकार नाही. बाजार समितीचे उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेतला आहे. - महादेव बडे, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, धारूर
===Photopath===
240421\24bed_1_24042021_14.jpg