२२ सराईत गुन्हेगार हद्दपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:35 AM2021-08-26T04:35:35+5:302021-08-26T04:35:35+5:30
बीड : चोऱ्या, घरफोड्यांसह मारामारीच्या आठ गुन्ह्यांतील २२ सराईत आरोपींना पोलीस अधीक्षक आर. राजा यांनी अखेर हद्दपारीचा दणका दिला. ...
बीड : चोऱ्या, घरफोड्यांसह मारामारीच्या आठ गुन्ह्यांतील २२ सराईत आरोपींना पोलीस अधीक्षक आर. राजा यांनी अखेर हद्दपारीचा दणका दिला. या आदेशाने जिल्ह्याच्या गुन्हे वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
गुन्हे करण्याच्या सवयीच्या लोकांच्या वर्तनात सुधारणा न झाल्यास महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ चे कलम ५५ अन्वये हद्दपारीच्या कारवाईचे पोलीस अधीक्षकांना अधिकार आहेत. त्यानुसार वेगवेगळ्या आठ प्रकरणांतील २२ आरोपींची पांगापांग करण्यासाठी तसेच त्यांच्या गुन्हे कृत्यांना ब्रेक लावण्यासाठी हद्दपार करण्यात आले. तत्पूर्वी ठाणेप्रमुखांकडूा प्राप्त प्रस्तावांवर सुनावणी घेण्यात आली. काही जणांना महिनाभरासाठी तर काही जणांना तीन ते सहा महिन्यांसाठी तालुक्यातून व नजिकच्या तालुक्यातून हद्दपार करण्यात आले.
...
या आरोपींचा समावेश...
धारुर ठाण्यांतर्गत
भास्कर ज्ञानोबा फुंदे, विलास ज्ञानोबा फुंदे, श्रीकांत प्रभाकर फुंदे (सर्व रा.उमराई ता.अंबाजोगाई) यांना धारुर, केज, वडवणी, अंबाजोगाई या तालुक्यांतून हद्दपार करण्यात आले. अंमळनेर ठाणे हद्दीतील आबा मल्हारी सुळ, दादासाहेब आबा सुळ, बालासाहेब बबन सुळ (सर्व रा.खोपटी ता.शिरुर) यांना शिरुर, आष्टी, पाटोदा या तालुक्यांतून तर संतोष गोरख खोटे, बापूराव साहेबराव खोटे, सुधाकर साहेबराव खोटे, युवराज ज्ञानदेव खोटे (सर्व रा.मूगगाव ता.पाटोदा) यांना पाटोदा, आष्टी, शिरुर तालुक्यांतून हद्दपार केले. चकलांबा ठाणे हद्दीतील जालिंदर सर्जेराव येवले, विशाल जालिंदर येवले, (दोघे रा.पाथरवाला खु. ता.गेवराई) यांना गेवराई तालुक्यातून हद्दपार करण्यात आले. बर्दापूर ठाणे हद्दीतील सिद्धेश्वर बालाजी दराडे, महादेव बालाजी दराडे (दोघे रा.दरडवाडी ता.अंबाजोगाई) यांना अंबाजोगाई तालुक्यातून तडिपार केले. पिंपळनेर ठाणे हद्दीतून हरिदास मनोहर जगताप, प्रताप हरिदास जगताप, अमोल हरिदास जगताप (सर्व रा.भवानवाडी ता.बीड) यांना बीड व वडवणी तालुक्यातून हद्दपार केले गेले. गेवराई ठाणे हद्दीतील संतोष हनुमान धनगर (रा.गोपाळवस्ती, बेलगाव ता.गेवराई) व भागवत सखाराम पवार (रा.नागझरी ता.गेवराई) यांना गेवराई तालुक्यातून हद्दपार केले गेले....
जिल्ह्यातील गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी हद्दपारीच्या कारवाया करण्यात आल्या. यातून गुन्हेगारी कृत्यांना आळा बसेल असा विश्वास आहे. आगामी पोळा, गणेशोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर या कारवाया केल्या आहेत.
- आर. राजा, पोलीस अधीक्षक, बीड
...