परळीत जुगार अड्ड्यावर कारवाईत २३ जणांना रंगेहात पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 07:39 PM2020-06-15T19:39:21+5:302020-06-15T19:40:21+5:30

धर्मापुरीत एका हॉटेलच्या बाजूस मोकळ्या जागेत जाऊन अचानक पोलिसांनी छापा मारला

23 persons caught red handed in gambling den operation in Parli | परळीत जुगार अड्ड्यावर कारवाईत २३ जणांना रंगेहात पकडले

परळीत जुगार अड्ड्यावर कारवाईत २३ जणांना रंगेहात पकडले

Next

परळी: तालुक्यातील धर्मापुरी येथे रविवारी सायंकाळी एका हॉटेलजवळील मोकळ्या जागेत  अंबाजोगाईच्या  अतिरिक्त जिल्हा पोलीस अधिक्षक स्वाती भोर यांच्या पथकाने  छापा टाकून 23 जणांना तिरट नावाचा जुगार खेळताना   रंगेहात पकडले आहे तर चौघे जण  पळून गेले आहेत पकडण्यात आलेल्या व्यक्तीकडून  जुगाराचे साहित्य ,मोबाईल व कार असा मिळून एकूण बारा लाख रुपये किमतीचे साहित्य  जप्त केले. अटकेतील जुगाऱ्यांमध्ये धर्मापुरी, अंबाजोगाई, लातूर, परळी, धारूर  येथील 23 जणांचा सामावेश आहे. याप्रकरणी  परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात सोमवारी पहाटे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.  

धर्मापुरीत एका हॉटेलच्या बाजूस मोकळ्या जागेत जाऊन अचानक पोलिसांनी छापा मारला तेव्हा जवळजवळ चार ठिकाणी गोलाकार स्थितीत बसून जुगार खेळत असताना 23 जण मिळून आले. ही कारवाई अतिरिक्त जिल्हा पोलीस अधिक्षक स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस जमादार बाळासाहेब फड, घोलप, तागड, सुरवसे,  पठाण, अंबाजोगाई ग्रामीणचे  सहाय्यक पोलीस निरीक्षक सावंत, पोलीस नाईक राऊत, डोंगरे, शिनगारे यांनी केली. 

आरोपींमध्ये दत्ता सोनवणे रा. नांदेडी ता. अंबाजोगाई, दत्तात्रेय धुनधूले, रा. परळी, सुरेश बांगर रा. धारूर, बबलू  भालेराव रा. धर्मापुरी, बाबुराव  शिंगारे  रा. धारूर, अक्षय मुळे रा. धारूर , संदीप काळे रा. परळी, अतुल काळे रा. अंबाजोगाई , शिवाजी किर्दत रा. कुंबेफळ, विशाल गोंदकर रा. लातूर, शेख एजाज शेख फराद रा. अंबाजोगाई, लायक फजत अली सय्यद रा. लातूर , आनंद कदम रा. अंबाजोगाई, संपत बळवंत रा. परळी, शशिकांत आवचारे रा. परळी, सुशील शेळके रा. धारूर, ज्ञानोबा फड रा. धर्मापुरी, दुर्गेश श्रीवास्तव रा. अंबाजोगाई, सुंदर माने रा. लातूर, ज्ञानेश्वर पतंगे रा. अंबाजोगाई, तानाजी मोरे रा. लातूर, ओम भगत रा. लातूर, अकबर बागवान रा. अंबाजोगाई यांचा समावेश आहे. तर चार जण या ठिकाणाहून पळून गेले आहेत त्यात जागा मालक पण आहेत. या प्रकरणी पोलीस नाईक रामचंद्र केकान हे पुढील तपास करीत आहेत.

Web Title: 23 persons caught red handed in gambling den operation in Parli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.