बीडमध्ये २३० किलो प्लास्टिक जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 12:43 AM2018-07-17T00:43:53+5:302018-07-17T00:44:12+5:30
बीड : शहरात आजही चोरट्या पद्धतीने प्लास्टिकचा वापर केला जात आहे. पालिकेच्या विशेष पथकाने दोन दुकानांवर धाड टाकून २३० किलो प्लास्टिक जप्त केले आहे. त्यांच्याकडून प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. सोमवारी दुपारी ही कारवाई बीडच्या भाजीमंडईत करण्यात आली.
राज्य सरकारकडून प्लास्टिक बंदचा आदेश प्राप्त होताच बीड पालिका कारवाईसाठी सरसावली. मुख्याधिकारी धनंजय जावळीकर यांनी विशेष पथकाची नियुक्ती केली. या पथकाने सोमवारी १७ दुकानांची तपासणी केली. यामध्ये दोन दुकानांमध्ये प्लास्टिक आढळून आले. त्यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला. तसेच २३० किलो कॅरीबॅग व इतर प्लास्टिक जप्त करण्यात आले.
९० हजारांचा दंड वसूल
बीड पालिकेने आतापर्यंत १०१९ दुकानांची तपासणी केली आहे. त्यांच्याकडून ९०६ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. यामध्ये ८९ हजार ९०० रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे.