२३८ नवे रुग्ण; १५३ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:21 AM2021-07-22T04:21:38+5:302021-07-22T04:21:38+5:30
जिल्ह्यात मंगळवारी ५ हजार ३७४ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचे अहवाल बुधवारी दुपारी प्राप्त झाले. यात २३८ पॉझिटिव्ह, ...
जिल्ह्यात मंगळवारी ५ हजार ३७४ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचे अहवाल बुधवारी दुपारी प्राप्त झाले. यात २३८ पॉझिटिव्ह, तर ५ हजार १३६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात ११, आष्टी ५७, बीड ३७, धारुर १३, गेवराई ३३, केज १४, माजलगाव ७, पाटोदा ३६, शिरुर २१ व वडवणी तालुक्यात ९ रुग्णांचा समावेश आहे. तसेच बुधवारी दिवसभरात १५३ जण बरे होऊन रुग्णालयातून घरी परतले. सुदैवाने २४ तासांत एकाही मृत्यूची नोंद आरोग्य विभागाकडे झाली नाही. कोेरोनाने आत्तापर्यंत २ हजार ५७७ जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण बाधितांची संख्या ९५ हजार ३७४ इतकी झाली असून, आतापर्यंत ९१ हजार ३९२ जण कोरोनामुक्त झाले. सध्या जिल्ह्यात १ हजार ४०५ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली.