अंबजोगाईत मालमत्ता करावर आता २४ टक्के विलंब शुल्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:33 AM2021-03-26T04:33:54+5:302021-03-26T04:33:54+5:30
अंबाजोगाई : अंबाजोगाई नगर परिषदेने घरपट्टी व नळपट्टीवर विलंब शुल्क २४ टक्के आकारणी सुरू केली आहे. तो विलंब शुल्क ...
अंबाजोगाई : अंबाजोगाई नगर परिषदेने घरपट्टी व नळपट्टीवर विलंब शुल्क २४ टक्के आकारणी सुरू केली आहे. तो विलंब शुल्क माफ करावा, या मागणीसाठी गुरुवारी नगरसेवक व नागरिकांनी नगर परिषदेचे मुख्याधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केले.
नगर परिषदेच्या वतीने नागरिकांची थकीत असलेल्या बाकीवर २४ टक्के विलंब शुल्क आकारण्यात येत आहे.शहरातील नागरिक गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आर्थिक अडचणीत आहेत.बाजारपेठेत अजुनही मंदीची लाट आहे.अनेक व्यापाऱ्यांचे व्यवसाय अनेक महिने बंद राहिले.तर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेकजण बेरोजगार झालेले आहेत.शहरातील बहुसंख्य नागरिकांची आर्थिक स्थिती खालावलेली आहे.अशा स्थितीत इतक्या मोठ्या प्रमाणात आकारले जाणारे मालमत्ता करावरील विलंब शुल्क परवडणारे नाही. त्यामुळे मालमत्ता करावरील विलंब शुल्क माफ करावा मागणीसाठी नगरसेवक व नागरिकांनी हे ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व जेष्ठ नगरसेवक शेख रहीमभाई यांनी केले.या आंदोलनात नगरसेवक सारंग पुजारी,संतोष शिनगारे,दिनेश भराडिया, खलील मौलाना,बाळासाहेब पाथरकर, शेख ताहेर,ॲड संतोष लोमटे,मयुर रणखांब यांच्यासह नागरिकांचा सहभाग होता.
२४ टक्के दंड आकारणी रद्द करावी
मालमत्ता करावर २४ टक्के दंड शहरवासीयांना परवडणारा नाही अंबाजोगाई नगर परिषदेच्या वतीने घरपट्टी व नळपट्टी थकीत असणाऱ्या नागरिकांकडून २४ टक्के दंड आकारणी सुरू आहे. ही आकारणी सामान्य नागरिकांना परवडणारी नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरापासून अनेक व्यवसाय व अनेक व्यवहार बंद अवस्थेत आहेत. अगोदरच व्यापारी आर्थिक मंदीच्या चक्रात सापडलेले आहेत. अशा स्थितीत २४ टक्के आकारण्यात येणारा दंड ही रक्कम शहरवासियांना परवडणार नाही. नगर परिषद प्रशासनाने घरपट्टी व पाणीपट्टी वरील २४ टक्के दंड आकारणी रद्द करावी ,अशी मागणीही आ.नमिता मुंदडा यांनी केली आहे.
===Photopath===
250321\avinash mudegaonkar_img-20210325-wa0034_14.jpg